Lasith Malinga Dainik Gomantak
क्रीडा

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, 48.22 कोटी कमावणाऱ्या खेळाडूने धरली दुसऱ्या संघाची वाट

2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली आणि तेव्हापासून लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला.

दैनिक गोमन्तक

2008 मध्ये आयपीएलची (IPL) सुरुवात झाली आणि तेव्हापासून लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला. मलिंगा संपूर्ण 13 वर्षे मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) खेळला पण आता त्याने तो संघ सोडला आहे. हा खेळाडू राजस्थान रॉयल्समध्ये दाखल झाल्याने मलिंगा आता मुंबई इंडियन्सचा प्रतिस्पर्धी बनला. मलिंगा (Lasith Malinga) आयपीएल (IPL 2022) च्या 15 व्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royal) वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक बनला आहे, असे मानले जाते की मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन त्याच्या निर्णयावरती नाराज आहे. वृत्तानुसार, मलिंगाच्या या निर्णयाने मुंबई इंडियन्सला आश्चर्य आणि निराश केले. (Big shock for Mumbai Indians, player earning Rs 48.22 crore awaits another team)

इनसाइड स्पोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मुंबई इंडियन्सला मलिंगाचा निर्णय आवडलेला नाहीये, मात्र राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकाराने काही वेगळेच सांगितले. कुमार संगकाराच्या म्हणण्यानुसार, मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धनेने मलिंगा राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

संगकारा मलिंगावरती काय म्हणाला?

कुमार संगकाराने मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगावरील नाराजीच्या वृत्तापेक्षा वेगळेच काहीतरी सांगितले. संगकारा म्हणाला, 'मला वाटते की महेला जयवर्धने खूश आहेत कारण राजस्थान रॉयल्सने मलिंगाला संधी दिली. मुंबई इंडियन्स मलिंगाला कोचिंग स्टाफमध्ये सामील करून घेण्यास उत्सुक असल्याचे नेहमीच होते परंतु त्यांचे कोचिंग युनिट पूर्णपणे भरलेले होते. आम्ही भाग्यवान आहोत की मलिंगाचा संबंध राजस्थानशी नाहीये.

मुंबईने मलिंगाला खूप काही दिले,

लसिथ मलिंगा 2008 पासूनच मुंबई इंडियन्सशी संबंधित होता. आयपीएल 2020 नंतर तो निवृत्त झाला. अहवालानुसार, मलिंगाने 12 वर्षांत मुंबई इंडियन्सकडून 48.22 कोटी रुपये कमावले. मलिंगाच्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीला कठीण परिस्थितीसाठी तयार करणे हे त्याचे काम असणार आहे. मलिंगा हा जगातील सर्वोत्तम डेथ ओव्हर गोलंदाज आहे आणि तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ही आहे.

मलिंगा राजस्थान रॉयल्समध्ये का सामील झाला?

लसिथ मलिंगा राजस्थान रॉयल्समध्ये सामील होण्याची खुप कारणे आहेत. कुमार संगकारा आणि मलिंगा हे एकमेकांना 15 वर्षांपासून ओळखतात. तसेच, संगकाराच्या नेतृत्वाखाली मलिंगाचा वेगवान गोलंदाज म्हणून उदय झाला आहे. मुंबई इंडियन्सकडे शेन बाँड आणि झहीर खान सारखे गोलंदाज मार्गदर्शक आहेत, त्यामुळे मलिंगाची जागा तिथे तयार झाली नाहीये. मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक आणि खेळाडू म्हणून मलिंगाचा प्रवास उत्कृष्ट होता आणि म्हणूनच राजस्थानने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT