FIFA World Cup 2022  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA विश्वचषक 2022 संदर्भात मोठी घोषणा, या 32 संघांची 8 गटात विभागणी

कतार येथे होणाऱ्या या विश्वचषकासाठी चार संघांना 8 गटात ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

FIFA फुटबॉल विश्वचषक 2022 संदर्भात आयोजकांनी मोठी घोषणा केली आहे. फिफा विश्वचषकाच्या यंदाच्या स्पर्धेसाठी संघ फायनल झाले आहे. कतार येथे होणाऱ्या या विश्वचषकासाठी चार संघांना 8 गटात ठेवण्यात आले आहे. हा अंतिम ड्रॉ आहे, परंतु अद्याप 3 संघांची घोषणा झालेली नाही, कारण दोन संघ प्लेऑफद्वारे पात्र ठरतील, तर एक संघ युरो कप प्लेऑफचा भाग असेल. (Big announcement regarding FIFA World Cup 2022, 32 teams were divided into 8 groups)

आत्तापर्यंत, कतार येथे होणाऱ्या FIFA फुटबॉल विश्वचषक (FIFA World Cup) 2022 साठी अ गटात यजमान कतार, इक्वेडोर, सेनेगल आणि नेदरलँड्स आहेत, तर ब गटात इंग्लंड, इराण, यूएसए आणि युरो कप प्लेऑफ संघ आहेत. तर, गट क मध्ये अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको आणि पोलंड यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गट ड मध्ये फ्रान्स, आयसी प्लेऑफ 1, डेन्मार्क आणि ट्युनिशिया यांचा समावेश आहे.

गट ई मध्ये स्पेन, IC प्लेऑफ 2, जर्मनी आणि जपान यांचा समावेश आहे, तर गट फ मध्ये बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को आणि क्रोएशिया यांचा समावेश आहे. ग्रुप क बद्दल बोलायचे झाले तर, ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड आणि कॅमेरून यांना स्थान मिळाले आहे, तर पोर्तुगाल, गाना, उरुग्वे आणि कोरिया रिपब्लिक यांना शेवटच्या ग्रुप एचमध्ये पात्र होण्याची संधी मिळाली आहे. ही स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत कतारमध्ये खेळवली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT