RRRच्या यशानंतर आता महेश बाबूसोबत एसएस राजामौली करणार नवा चित्रपट?

राजामौली आपला आगामी चित्रपट साऊथचे स्टार महेश बाबूसोबत (Mahesh Babu) करणार आहेत.
SS Rajamouli and Mahesh Babu
SS Rajamouli and Mahesh BabuDainik Gomantak
Published on
Updated on

SS Rajamouli and Mahesh Babu : साऊथचे लोकप्रिय दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासोबत सर्वच कलाकारांना काम करावेसे वाटते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि मोठे चित्रपट दिले आहेत. अलीकडेच राजामौली यांचा आरआरआर (RRR) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे ज्याला समीक्षक आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कमाई केली आहे. (After the success of RRR SS Rajamouli will now make a new film with Mahesh)

SS Rajamouli and Mahesh Babu
लग्नाचं ठिकाण ठरलं! रणबीर कपूर-आलिया भट्ट घेणार सप्तपदी

आता बातमी आली आहे की राजामौली (SS Rajamouli) पुन्हा एक मोठा चित्रपट घेऊन येत आहेत. मात्र, खुद्द राजामौली यांनी याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. पण आता येत असलेल्या बातम्यांनुसार, राजामौली आपला आगामी चित्रपट साऊथचे स्टार महेश बाबूसोबत (Mahesh Babu) करणार आहेत.

अलीकडेच राजामौली म्हणाले की लॉकडाऊन दरम्यान त्यांना आरआरआर चित्रपटासाठी अनेक गोष्टी लवकर पूर्ण कराव्या लागल्या. अनेक गोष्टी पुढे ढकळून त्यांना फक्त आरआरआरवर लक्ष केंद्रित करावे लागले. त्यांनी असेही सांगितले की, ते सध्या एका कथानकावर काम करत आहेत जे खूपच मनोरंजक आहे.

RRR च्या यशानंतर राजामौली सध्या छोट्या सुट्टीवर आहेत. त्यांना सध्या आराम करायचा आहे. दुसरीकडे, महेश बाबू राजामौली यांच्यासोबत काम करण्यापूर्वी त्यांच्या उर्वरित कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण करत आहेत. महेशच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 2020 मध्ये सरिलेरू नीकेव्वारू या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात महेशसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com