Richard Hadlee Dainik Gomantak
क्रीडा

रिचर्ड हॅडलीला भारतीय क्रिकेटपटूवर पैज लावणे पडले होते महागात; काय आहे प्रकरण

न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या भारतीय महिला क्रिकेट आणि त्यांचा पहिला न्यूझीलंड दौरा कोणी विसरू शकणार नाही.

दैनिक गोमन्तक

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या 2022 च्या विश्वचषकाच्या तयारीचा काउंटडाउन सुरु झाला आहे. या दौऱ्यात टीम 5 वनडे आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. कोविड महामारीमुळे (Corona) एक वर्ष पुढे ढकलल्यानंतर महिला क्रिकेट विश्वचषक यंदा मार्च-एप्रिलमध्ये न्यूझीलंडमध्ये खेळला जाणार आहे. (Betting on an Indian cricketer cost Richard Hadlee dearly)

न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या भारतीय महिला क्रिकेट आणि त्यांचा पहिला न्यूझीलंड दौरा कोणी विसरू शकणार नाही. हा दौरा 1976-77 हंगामातील डिसेंबर-जानेवारी महिन्यांत होता आणि ऑस्ट्रेलियालाही गेले होते. या आधी सहसा असेच होत होते अंतर आणि कमी प्रवास यामुळे, पुरुष संघ देखील सहसा एकत्र ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जात होता.

या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक कसोटी सामना खेळला जात होता. या दौऱ्यात 5 प्रथम श्रेणी सामने, 4 लिस्ट ए सामने आणि 3 इतर सामने खेळले जात होते. तेव्हा आजच्याप्रमाणे भारतात महिला क्रिकेटचे आयोजन करण्यात आले नव्हते तेव्हा त्यांच्यासाठी वेगळे बोर्ड होते आणि पैशाची कमतरता होती याचा सहज अंदाज लावता आपल्याला लावता येतो. तेव्हाच्या क्रिकेटची कथा थोडी वेगळीच होती.

पैशांची बचत करण्यासाठी, भारतीय खेळाडूंना स्थानिक कुटुंबांच्या घरात वास्तव्यासाठी थांबवले जायचे. त्यापैकी बहुतेक भारतीय वंशाच्या स्थायिकांची कुटुंबे किंवा स्वत: होस्ट करण्याची ऑफर देणारी कुटुंबे देखील होती. यापैकी एक न्यूझीलंडमधील स्थित प्रसिद्ध हेडली कुटुंब होते. कॅरेन हेडली तेव्हा न्यूझीलंडकडून खेळत असे आणि रिचर्ड हेडली आयकॉन राहिले होते. या दौऱ्याचे दोन किस्से खूप मजेदार आहेत आणि डायना एडुलजीचे नाव या दोघांशीच जोडले गेले आहे.

एका सामन्यादरम्यान रिचर्ड हॅडलीही स्टेडियममध्ये सामना बघण्यासाठी आला होता. त्याला त्याच्या पत्नी कॅरेनला खेळताना पाहण्यात रस होता, तर त्याला हेही पाहायचे होते की भारतातून आलेल्या क्रिकेटपटू कसे खेळतात? तर त्याने जे पाहिले त्यावर तो गप्प बसला नाही. डायनाशी झालेल्या संवादात तो म्हणाला की, मला वाटतं की हा हाडकुळी क्रिकेटपटू एक चौकारही मारू शकणार नाही, सहा षटकारच तर सोडाच.

तेव्हा डायना 20 वर्षांची होती, आणि ती सुरुवातीपासूनच स्पष्टवक्ती होती. हे ऐकून त्याला धक्काच बसला, या दौऱ्यावेळी ती सिक्सर ठोकूनच दाखवेल, अशी पैज रिचर्डशी तीने लावली. डायनाने सिक्सक मारल्यास हेडली तिला कौंटी क्रिकेटसाठी त्याची एक बॅट बक्षीस देईल, असे त्या पैजे मध्ये ठरले. पुढच्याच सराव सामन्यात डायनाने मिड-विकेटवर सिक्सर ठोकला. प्रत्येकाला वाटले की पैज हा एक विनोद असेल, परंतु रिचर्ड हेडली एक वचन देऊन बाहेर आला पण त्याने केवळ त्याचा अंदाज चुकीचा असल्याचे मान्य केले नाही तर त्याने डायनाला त्याची एक बॅट देखील दिली.

डायना वर्षानुवर्षे न्यूझीलंडमध्ये असलेल्या एका भारतीय कुटुंबाच्या घरात राहात होती आणि त्यांनी तिथली वास्तविक जीवनशैली पूर्णपणे स्वीकारली होती. पहिल्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या यजमानांनी चहा घेणार का असे त्यांना विचारले. डायना आणि तिच्या सोबतच्या क्रिकेटपटूने आधीच चहा प्यायला असल्याने त्यांना नकार दिला.

दोन तासांनी जेवणाची वेळ झाली, आता भूक तर लागली होती, पण जेवणाची तिथे काही चिन्हेच नव्हती. कोणीही त्यांना रात्रीच्या जेवणासाठी सांगितले नाही. जेव्हा भुक सहन होईना तेव्हा त्यांनी हिंमत एकवटली आणि यजमानाला जेवणाबद्दल विचारले. यजमानाने मोठ्या सहजतेने उत्तर दिले, पण आश्चर्याने, 'आम्ही तुम्हाला चहा मागवला होता पण तुम्ही नकार दिला.' तेव्हाच भारतातून गेलेल्या या क्रिकेटपटूंच्या लक्षात आले की न्यूझीलंडमध्ये संध्याकाळची 'चाय' म्हणजे रात्रीचे जेवण आहे. त्यानंतर त्यांनी परत कधीही चहाची ऑफर नाकारली नाही.

आज कोणीही शफाली वर्मा आणि हरमनप्रीत यांसारख्या शक्तिशाली स्ट्रोक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटपटूंना चौकार आणि षटकार मारण्याचे आव्हान करणार नाही. आता क्रिकेटपटू मोठमोठ्या हॉटेल्समध्ये राहत असल्याने 'चाय' प्रकरण राहिलेच नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT