यासिन मलिकच्या समर्थनार्थ पुन्हा बडबडला शाहिद आफ्रिदी, भारतीय लेगस्पिनरने दिलं चोख प्रत्युत्तर

आफ्रिदीने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख यासिन मलिकबद्दल (Yasin Malik) बालिश ट्विट केले आहे.
Yasin Malik Shahid Afridi
Yasin Malik Shahid AfridiDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) त्याच्या भारतविरोधी वक्तव्यामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीने भारताला पाकिस्तानचा शत्रू देश म्हटले होते. आणि आज आफ्रिदीने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख यासिन मलिकबद्दल (Yasin Malik) बालिश ट्विट केले आहे.

आफ्रिदीने ट्विटरवर लिहिले की, 'मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना भारत ज्या प्रकारे गप्प करण्याचा प्रयत्न करत आहे, ते चूकीचं आहे. यासीन मलिक वरील खोडसाळ आरोपांमुळे काश्मीरचा स्वातंत्र्यलढा थांबणार नाही. मी संयुक्त राष्ट्रांना आवाहन करतो की, काश्मिरी नेत्यांच्या विरोधात अशा अनैतिक ट्रोल्सची दखल घ्यावी.'

आफ्रिदीच्या या ट्विटला लेगस्पिनर अमित मिश्राने चोख प्रत्युत्तर दिले आहे. अमित मिश्राने लिहिले, 'प्रिय शाहिद आफ्रिदी, त्याने कोर्टरूममध्ये स्वतःला दोषी कबूल केले आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या वाढदिवसासारखी दिशाभूल करणारी असू शकत नाही.'

Yasin Malik Shahid Afridi
अप्रतिम शैली ! डोकं चक्रावेल अशी बॉलिंग अॅक्शन पाहा व्हिडीओ

शाहिद आफ्रिदीने यापूर्वीही काश्मीर मुद्द्यावर वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधाने केली होती आणि त्याला अमित मिश्राने प्रतिउत्तर दिले होते .

शाहिद आफ्रिदीही त्याच्या वयामुळे वादात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनुसार, आफ्रिदीचा जन्म 1 मार्च 1980 रोजी झाला, म्हणजेच त्याचे वय 42 वर्षे आहे. 2019 मध्ये, आफ्रिदीने 1996 मध्ये नैरोबी येथे श्रीलंकेविरुद्ध 37 चेंडूत विक्रमी शतक झळकावले तेव्हा तो 16 वर्षांचा नव्हता असे उघड केले.

दरम्यान काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्या शिक्षेवर आज विशेष एनआयए कोर्टात चर्चा पूर्ण झाली आहे. काही वेळात न्यायालय शिक्षेची घोषणा करेल.

खरे तर यासीन मलिकला ज्या कलमांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे, त्या कलमांमध्ये जास्तीत जास्त फाशीची किंवा किमान जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे, ज्यावर एनआयए न्यायालय आजपासून काही वेळानंतर शिक्षा सुनावणार आहे. कोर्टात यासीनने न्यायाधीशांना सांगितले की, बुरहान वानीला मारल्याची घोषणा झाल्यापासून मी सतत तुरुंगात आहे, मग माझ्यावर हे आरोप कसे? तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या, अशी विनवणी मी करणार नाही, पण मी दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याचा काही पुरावा आहे का ते पहा? असही यासीनने कोर्टा पुढे म्हटल आहे.

Yasin Malik Shahid Afridi
VIDEO: फ्रेंच स्टार जो-विल्फ्रेड सोंगाने रडत रडत केला टेनिसला अलविदा

दरम्यान, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख यासीन मलिक याला टेरर फंडिंग केल्याप्रकरणी कधीही निर्णय येऊ शकतो. यासिन मलिकला लॉकअपमधून कोर्टरूममध्ये आणण्यात आले आहे. दरम्यान, अनेक लोक तिरंगा घेऊन न्यायालयाबाहेर पोहोचले आहेत. त्याचवेळी, श्रीनगरजवळील मैसुमा येथे यासीन मलिकच्या घराजवळ मलिक समर्थक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com