Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

England vs New Zealand: बेन स्टोक्सने झंझावाती शतक झळकावून रचला इतिहास, 'या' दोन खेळाडूंचे मोडले रेकॉर्ड

England vs New Zealand: बेन स्टोक्सची गणना जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने इंग्लंड संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.

Manish Jadhav

England vs New Zealand: बेन स्टोक्सची गणना जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने इंग्लंड संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.

2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात चार एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बेन स्टोक्सने झंझावाती शतक झळकावले आणि आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले.

न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावताच त्याने अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. त्याने जेसन रॉय आणि रॉस टेलरचा विक्रम मोडीत काढला.

6 वर्षांनंतर शतक केले

बेन स्टोक्सने जुलै 2022 मध्ये रिटायरमेंटची घोषणा केली होती. मात्र 2023 चा एकदिवसीय विश्वचषक पाहता त्याने रिटायरमेंटचा निर्णय मागे घेतला.

स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केले आणि आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्टोक्सने तूफानी फटकेबाजी केली.

न्यूझीलंडचे (New Zealand) गोलंदाज त्याच्यापुढे टिकू शकले नाहीत. त्याने 6 वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. यापूर्वी, त्याने 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते. स्टोक्सचे वनडे क्रिकेटमधील हे चौथे शतक आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्ध बेन स्टोक्सने डावाच्या सुरुवातीपासूनच शानदार फलंदाजी केली. त्याने 124 चेंडूत 182 धावा केल्या, ज्यात त्याने 15 चौकार आणि 9 षटकार मारले होते.

स्टोक्स आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी (England) सर्वात मोठी खेळी खेळणारा खेळाडू बनला आहे. त्याने जेसन रॉयचा 10 वर्षे जुना विक्रम मोडला. रॉयने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 180 धावांची तूफानी खेळी खेळली होती.

इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळलेले खेळाडू:

182 - बेन स्टोक्स विरुद्ध न्यूझीलंड (2023)

180 - जेसन रॉय विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2018)

171 - अॅलेक्स हेल्स विरुद्ध पाकिस्तान (2016)

167* - रॉबिन स्मिथ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (1993)

162* - जोस बटलर विरुद्ध नेदरलँड्स (2022)

तसेच, बेन स्टोक्स न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने 182 धावा केल्या. यासह, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक डाव खेळणारा दुसरा खेळाडू बनला आहे.

त्याने रॉस टेलरचा विक्रम मोडला. 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर खेळताना टेलरने 181 धावांची खेळी खेळली होती. पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचे विवियन रिचर्ड्स आहेत, ज्यांनी चौथ्या क्रमांकावर खेळताना 189 धावांची तूफानी खेळी खेळली होती.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर सर्वात मोठी खेळी खेळणारे खेळाडू:

189 - व्हिव्हियन रिचर्ड्स विरुद्ध इंग्लंड (1984)

182* - बेन स्टोक्स वि न्यूझीलंड (2023)

181 - रॉस टेलर विरुद्ध इंग्लंड (2018)

181 - व्हिव्हियन रिचर्ड्स विरुद्ध श्रीलंका (1987)

176 - एबी डिव्हिलियर्स विरुद्ध बांगलादेश (2017)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

SCROLL FOR NEXT