Non Striker Run Out | Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: नॉन-स्ट्रायकरला रनआऊट करण्यापेक्षा करा 'हा' उपाय, स्टोक्सची 'नो-कॉन्ट्रोवर्सी' कल्पना

नॉन-स्ट्रायकरला रनआऊट करण्याबद्दल क्रिकेट विश्वात दोन विचारधारा पाहायला मिळत असून आता याबद्दल बेन स्टोक्सने वेगळीच कल्पना मांडली आहे.

Pranali Kodre

Non-Striker Run-Out: सोमवारी (10 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 15 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला नाट्यमयरित्या 1 विकेटने पराभूत केले. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला होता. दरम्यान, या सामन्यात अनेक नाट्यमय घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात या सामन्याची चर्चाही रंगली.

हर्षल पटेलचा नॉन-स्ट्रायकरला धावबाद करण्याचा प्रयत्न

या सामन्यात आरसीबीने लखनऊला 213 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 1 धावेची गरज होती, तर आरसीबीला सामना बरोबरीत राखण्यासाठी एका विकेटची किंवा निर्धाव चेंडूची गरज होती. यावेळी आरसीबीकडून हर्षल पटेल गोलंदाजी करत होता, तर लखनऊकडून आवेश खान स्ट्राईकवर होता आणि रवी बिश्नोई नॉन-स्ट्राईकला होता.

यावेळी हर्षलने हा चेंडू टाकण्यावेळी बिश्नोईला आधीच क्रिज सोडून बाहेर जाताना पाहिले. त्यामुळे त्याने त्याला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडून स्टम्पला चेंडू लागला नाही. त्यामुळे तो त्याच लयीत क्रिजमधून पुढे गेला आणि त्यानंतर त्याने चेंडू स्टम्पवर मारला. पण अशाप्रकारे क्रिजच्या पुढे जाऊन धावबाद नियमात बसत नसल्याचे सांगत पंचांनी हर्षलला पुन्हा हा चेंडू टाकण्यास सांगितले.

अखेर पुन्हा अखेरचा चेंडू हर्षलने टाकल्यानंतर त्यावर यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडून गोंधळ झाला आणि आवेश व बिश्नोईने एक धाव पूर्ण केली. त्यामुळे लखनऊने विजयावर शिक्कामोर्तब केले.

भोगलेंच्या ट्वीटला स्टोक्सचे उत्तर

दरम्यान, या सामन्यानंतर हर्षलने बिश्नोईला धावबाद करण्याच्या प्रयत्नावरून बरीच चर्चा रंगली. याबद्दल वरिष्ठ क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी ट्वीट केले की 'बिश्नोईने लवकर क्रिज सोडली होती. पण काही मुर्ख लोक अजूनही म्हणत आहेत का की तुम्ही नॉन-स्ट्रायकरला धावबाद करू शकत नाही?'

या ट्वीटला इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने उत्तर दिले आहे की 'हे हर्षाचे विचार आहेत? जर कोणी लवकर क्रिज सोडून चुकीचा फायदा घेत असेल, तर पंचांच्या विवेकानुसार 6 पेनल्टी धावा देण्यात याव्यात? यामुळे फलंदाजांना असे करण्यापासून कोणताही वाद न होता थांबवता येईल.'

स्टोक्सच्या ट्वीटवरून असे लक्षात येते की त्याने गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच जर नॉन-स्ट्रायकर क्रिज सोडत असेल, तर 6 पेनल्टी धावा देण्यात याव्यात असा पर्याय मांडला आहे.

नॉन-स्ट्रायकर धावबादवरून दोन विचारधारा

दरम्यान, नॉन-स्ट्रायकर एन्डवरील फलंदाजाला गोलंदाजाने धावबाद करण्याला यापूर्वी मंकडिंग म्हणून ओळखले जात होते. पण अशाप्रकारच्या विकेटबद्दल क्रिकेटविश्वात दोन विचारधारा आहेत. काहींचे मत आहे की अशाप्रकारची विकेट ही खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध आहे. तर काहींनी अशाप्रकारे विकेट घेण्याला पाठिंबा दिला आहे.

मात्र, क्रिकेट नियम बनवणाऱ्या एमसीसीने स्पष्ट केले आहे मंकडिंगलाही सर्वसाधारण धावबादप्रमाणेच समजण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT