Ben Stokes Bowled Rohit Sharma PTI
क्रीडा

IND vs ENG, Video: स्टोक्स तब्बल 251 दिवसांनी गोलंदाजीला उतरला अन् शतक केलेल्या रोहितचा त्रिफळा उडवला

Ben Stokes Clean Bowled Rohit Sharma: भारताविरुद्ध धरमशाला कसोटीत तब्बल 251 दिवसांनी गोलंदाजी करताना स्टोक्सने पहिल्याच चेंडूवर शतकवीर रोहित शर्माला त्रिफळाचीत केले.

Pranali Kodre

Ben Stokes Clean Bowled India Captain Rohit Sharma:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारपासून (7 मार्च) चालू झालेल्या कसोटी मालिकेतील पाचव्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजी करतानाही दिसला. इतकेच नाही, तर त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्माची विकेटही घेतली.

धरमशाला येथे सुरु असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी विकेट न गमावता खेळून काढले. तसेच शतकेही साजरी केली.

पण दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच 62 व्या षटकात स्टोक्सने गोलंदाजीसाठी चेंडू हातात घेतला. त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शतक केलेल्या रोहितला बाद केलं.

स्टोक्सने गुड लेंथवर टाकलेल्या या सुरेख चेंडूने रोहितला चकवत त्याच्या बॅटची बाहेरची कड घेतली आणि ऑफ स्टंपवरील बेल्स उडवले. त्यामुळे रोहितला 162 चेंडूत 103 धावांची खेळी करत माघारी परतावे लागले.

दरम्यान, स्टोक्सने या सामन्यात तब्बल 251 दिवसांनंतर चेंडू हातात घेतला आहे. विशेष म्हणजे 251 दिवसांनी कसोटीत गोलंदाजी करताना त्याने पहिल्याच चेंडूवर रोहितची विकेट घेण्याची करामतही केली.

त्याने यापूर्वी अखेरीस जून 2023 च्या अखेरच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी केली होती. मधल्या काळात त्याला गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे त्याने बराच काळ गोलंदाजी केली नव्हती.

दरम्यान, स्टोक्सने रोहितला बाद केल्यानंतर 63 व्या षटकात शुभमन गिलला जेम्स अँडरसनने त्रिफळाचीत केले. गिलने 150 चेंडूत 110 धावांची खेळी केली.

त्यांच्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि सर्फराज खान यांनीही अर्धशतके केली. पण अर्धशतकानंतर ते दोघेही बाद झाले. दरम्यान, भारताने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 400 धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच भारताला 200 हून अधिक धावांची आघाडी मिळाली आहे.

या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 218 धावांवरच सर्वबाद झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: तपासाची चक्रे फिरली अन् 'सुसान' जाळ्यात अडकली! वार्का ड्रग्ज प्रकरणाला 'आंतरराष्ट्रीय' वळण; अमेरिकन महिलेला गोव्यात बेड्या

Goa Night Club Fire: 'फायर अलार्म' वाजलाच नाही'! आर्थिक फायद्यासाठी लुथरा बंधूंचा लोकांच्या जीवाशी खेळ; सरकारी पक्षाचा गंभीर आरोप

Goa Night Club Fire: 'क्लबमध्ये ‘पायरो’ पेटवणारे अजूनही मोकाटच!', लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; 5 फेब्रुवारीला फैसला

Tuyem Government Hospital: तुये इस्पितळासाठी 'फास्ट ट्रॅक' तयारी! कंत्राटी कर्मचारी भरतीचाही मार्ग मोकळा; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Goa Crime: बायकोच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या 24 तासांत नवऱ्यानही संपवलं जीवन; उत्तर प्रदेशच्या दाम्पत्याचा गोव्यात दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT