Sachin and Arjun Tendulkar
Sachin and Arjun Tendulkar 
क्रीडा

Sachin-Arjun: केवळ सचिन-अर्जुनच नाही, तर या भारतीय पिता-पुत्रांच्या जोडीनेही ठोकलेलं पदार्पणात शतक

Pranali Kodre

Sachin and Arjun Tendulkar: बुधवारी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने गोव्याकडून प्रथम श्रेणीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी केली. या खेळीबरोबरच त्याने सचिनच्या एका विक्रमाची बरोबरी केली.

अर्जुन सध्या रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात गोव्याच्या संघाकडून खेळत आहे. दरम्यान, या हंगामात गोव्याचा पहिला सामना राजस्थानविरुद्ध झाला. या सामन्यात पहिल्याच डावात अर्जूनने 207 चेंडूत 120 धावांची खेळी केली. यापूर्वी 34 वर्षांपूर्वी 1988 साली सचिननेही त्याच्या पदार्पणाच्या रणजी सामन्यात मुंबईकडून खेळताना गुजरातविरुद्ध नाबाद 100 धावांची खेळी केली होती.

पण, पदार्पणाच्या सामन्यात असे शतक झळकावणारी सचिन आणि अर्जुन काही पहिली पिता-पुत्रांची जोडी नाही. यापूर्वी एका पिता-पुत्रांच्या जोडीनेही असा कारनामा केला आहे. तेही आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी क्रिकेटमध्ये. ती जोडी म्हणजे लाला अमरनाथ आणि सुरिंदर अमरनाथ.

लाला अमरनाथ यांनी डिसेंबर 1933 मध्ये इंग्लंडविरुद्ध मुंबईत कसोटी पदार्पणाच्या सामन्यात दुसऱ्या डावात 21 चौकारांसह 118 धावांची खेळी केली होती. विशेष गोष्ट अशी की हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील देखील भारताचे पहिलेच शतक देखील ठरले होते. तसेच लाला अमरनाथ यांनी खेळलेल्या 24 कसोटींमध्ये त्यांनी केलेले हे एकमेव शतक आहे.

तसेच त्यानंतर लाला अमरनाथ यांच्या तिन्ही मुलांनी क्रिकेटमध्येच कारकिर्द घडवली. पण त्यांचा मुलगा सुरिंदर यांनी लाला यांच्याप्रमाणेच कसोटी पदार्पणात शतक करण्याचा कारनामा केला. सुरिंदर यांची कारकिर्द फार काळ लांबली नाही.

पण त्यांनी जानेवारी 1976 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंडला खेळताना पहिल्या डावात 124 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्यांनी 16 चौकार आणि 1 षटकार मारला होता. विशेष म्हणजे सुरिंदर यांनाही या शतकानंतर त्यांच्या 10 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत एकही शतक करता आले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT