Arjun Tendulkar: भाऊरायाचे कौतुक! अर्जुनच्या शतकाने सारा इमोशनल, म्हणतेय 'तुझी बहीण म्हणून...'

अर्जुन तेंडुलकरने रणजी पदार्पणात शतक केल्यानंतर बहीण साराने इमोशनल प्रतिक्रिया दिल्यात.
Sara and Arjun Tendulkar
Sara and Arjun TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Trophy 2022-23: रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामाला सुरुवात झाली असून गोव्याचा संघ पहिला सामना राजस्थानविरुद्ध गोवा क्रिकेट असोसिएशन ऍकेडमी ग्राऊंडवर होत आहे. या सामन्यात गोव्याकडून सुयश प्रभुदेसाई आणि अर्जुन तेंडुलकरने फलंदाजीत दमदार कामगिरी केली. दरम्यान, अर्जुनची मोठी बहीण सारा तेंडुलकरने भावासाठी खास पोस्टही केले आहेत.

Sara and Arjun Tendulkar
ICC ODI Rankings: बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावणाऱ्या ईशानची ICC क्रमवारीत गगनभरारी!

अर्जुनचे पहिले शतक

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने गोव्याकडून राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच २०७ चेंडूत १२० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले.

याबरोबरच तो रणजी पदार्पणात शतक करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये सामील झाला आहे. या यादीत त्याचे वडील सचिन देखील आहे. सचिनने 34 वर्षांपूर्वी 1988 साली मुंबईकडून गुजरातविरुद्ध रणजी पदार्पण करताना नाबाद 100 धावांची खेळी केली होती.

Sara and Arjun Tendulkar
Kane Williamson: विश्वविजेता विलियम्सनने सोडले कसोटी कर्णधारपद, न्यूझीलंडला मिळाला नवा 'कॅप्टन'
Sara Tendulkar's instagram posts
Sara Tendulkar's instagram postsDainik Gomantak

साराकडून भावाचे कौतुक

दरम्यान, अर्जुनने केलेल्या या कामगिरीने साराही आनंदी झाली आहे. त्यामुळे तिने इंस्टाग्राम स्टोरीवर भावासाठी काही खास पोस्टही केल्या आहेत. तिने तिच्या एका पोस्टवर लिहिले आहे की 'आज बहीण म्हणून अभिमान वाटतोय.' तसेच तिने दुसऱ्या पोस्टवर 'तुझ्या सगळ्या मेहनतीचे आणि संयमाचे हळुहळू फळ मिळत आहे.'

तिने आणखी एक पोस्ट केली असून यावर तिने भावनिक कॅप्शन लिहिले आहे. तिने लिहिले आहे की 'ही फक्त सुरुवात आहे... तुझी बहीण नेहमीच तुझ्या पाठीशी आहे.'

साराच्या या पोस्ट सध्या व्हायरल होत असून अनेकांनी या भावा-बहीणीच्या जोडीचे कौतुक केले आहे.

Sara and Arjun Tendulkar
Arjun Tendulkar चे सचिनच्या पावलावर पाऊल! शतकासह वडीलांच्या 34 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

सुयशचे द्विशतक

सुयश प्रभुदेसाईनेही या सामन्याद शानदार खेळ केला. त्याने 416 चेंडूत 212 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २९ चौकार मारले. तसेत सुयश आणि अर्जुन यांच्यात 221 धावांची भागीदारीही झाली. त्यामुळे गोव्याने पहिला डाव तब्बल 9 बाद 547 धावांवर घोषित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com