देशात कोरोना संसर्गचा प्रसार (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यंदाच्या इंडियन प्रिमिअर लिगच्या (आयपीएल) (IPL) उर्वरित सामन्यांवर कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे. संघातील अनेक खेळांडूना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उर्वरित राहीलेले सामने होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Night Riders) दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्सविरुध्दचा (Royal Challengeres Banglore) सामना पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान चेन्नईच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. बायो-बबलमध्ये कोरोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आयपीएलवरही कोरोनाचं सावट आल्याने बीसीसीआयच्या चिंतेत मोठी भर पडली असून बीसीसीआयकडून (BCCI) मोठा निर्णय घेण्यात आला असून आयपीएलचे पुढील सामने रद्द करण्यात आले आहेत. (BCCI took big decision Next IPL matches canceled)
बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सर्व सामने मुंबईत शिप्ट करण्याचा विचार करत होती. मुंबईमधील वानखेडे, डी वाय पाटील, आणि ब्रेब्रॉर्न या तीन मैदांनामध्ये हे सामने खेळवले जाऊ शकतात. वानखेडे मैदानात आत्तापर्यंत आयपीएलचे दहा सामने पार पडले आहेत. तर इतर दोन मैदाने सराव सामन्यासाठी वापरण्यात आली आहेत.
सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बंगळूरसोबतचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती सध्या होमक्वारंटाईन कक्षात असून त्यांच्यावर आरोग्य तज्ञ लक्ष ठेवून आहेत. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघ देखील विलगीकरकण कक्षामध्ये आहे.
आयपीएलकडून देण्यात आलेल्या माहीतीनुसार, ‘’कोरोना चाचणीच्या पहिल्या फेरीमध्य़े संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तर इतर संघाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. दोन्ही संघाला इतर खेळाडूंपासून वेगळं विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे. तज्ञ डॉक्टर त्यांच्या सतत संपर्कात आहेत दरम्यान संघातील इतर कोणत्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे का याची तपासणी करण्यात येत आहे.’’
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठा फटका बसला असून स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. यामुळे आत्तापर्यंत पाच खेळाडू आय़पीएल सुरु असतानाच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.