BCCI Blue Tick Dainik Gomantak
क्रीडा

PM मोदींच्या आवाहनानंतर डीपीवर लावला तिरंगा अन् BCCI ने गमावले ब्लू टीक, काय आहे प्रकरण?

BCCI Blue Tick : रविवारी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून डीपीला तिरंगा लावताच बीसीसीआयचे ब्लू टीक हटवण्यात आले.

Pranali Kodre

BCCI loses blue tick verification on X Twitter after changing display picture to tricolour:

रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय संघात फ्लोरिडाला झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात ८ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. पण या सामन्याला सुरुवनात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला एक धक्का बसला.

बीसीसीआयला एक्स (ट्वीटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हेरिफिकेशनचे ब्लू टीक गमवावे लागेल आहे. यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली होती. पण यामागे कारण म्हणजे बीसीसीआयने बदलला डिस्प्ले पिच्चर (डीपी) आहे.

भारत 15 ऑगस्ट रोजी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. त्याचमुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी भारतीयांना आवाहन केले होते की 'हर घर तिरंगा' या मोहिमेचा भाग होत सोशल मीडियावरील डीपीवर भारताच्या झेंड्याचा फोटो लावावा.

याच आवाहनानंतर बीसीसीआयने रववारी दुपारी डीपीवरील आपला लोगो काढून तिरंगा लावला होता. मात्र, त्यानंतर एक्सने बीसीसीआयच्या समोरील ब्लू टीक हटवले.

यामागील कारण म्हणजे एक्सने बदललेल्या पॉलिसीनुसार व्हेरिफाईड युझरने डीपी बदलल्यानंतर ब्लू टीक हटवली जाईल. त्यानंतर ती ब्लू टीक पुन्हा नावासमोर येण्यासाठी एक्सकडून त्या युझरचा एक जलद रिव्ह्यू घेतला जाईल. यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो.

दरम्यान, याच पॉलिसीमुळे केवळ बीसीसीआयच नाही, तर अनेकांच्या नावापुढील ब्लू टीक हटवण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याही एक्स अकाउंटचे व्हेरिफिकेशन टीक हटवण्यात आले आहे. तथापि, बीसीसीआयने येत्या काही दिवसात पुन्हा ब्लू टीक मिळू शकते.

दरम्यान, भारतीय संघाबद्दल सांगायचे झाल्यास आता भारतीय संघाला १८ ते २३ ऑगस्ट दरम्यान आयर्लंड विरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर ३० ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मुख्यमंत्री, तानावडे व सभापती दिल्लीत, चर्चांना उधाण; मंत्रिमंडळ फेरबदलाचा मात्र इन्कार

IPL Auction 2025: मास्टर ब्लास्टरच्या लेकाला मिळाला खरेदीदार! शेवटच्या क्षणी MI ने खेळला मोठा डाव

Rashi Bhavishya 26 November 2024: कुंटुबात आनंदाचे वातावरण राहील, पण बोलण्यावर ताबा ठेवा... काय सांगयतं 'या' राशीचं भविष्य?

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

SCROLL FOR NEXT