BCCI's Income Tax: बाबो! BCCI ने एका वर्षात भरला कोट्यवधींचा टॅक्स, आकडा ऐकून जाल चक्रावून

BCCI Income Tax: बीसीसीआयने गेल्यावर्षा किती टॅक्स भरला याबद्दल राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचे उत्तर राज्य अर्धमंत्र्यांनी दिले आहे.
BCCI
BCCIDainik Gomantak

BCCI paid 1,159 crore Rs income tax in 2021-2022 fiscal: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत मंडळ म्हणून ओळखले जाते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडूनही बीसीसीआयला सर्वाधिक ३९ टक्के महसूलही मिळतो.

त्यामुळे बीसीसीआयची कमाई ही नेहमीच चर्चेचा विषय असतो. याबद्दल राज्यसभेतही चर्चा झाली.

BCCI
BCCI Announced Schedule: टीम इंडियाच्या 2023-2024 हंगामातील वेळापत्रकाची घोषणा! भारतात रंगणार 16 सामन्यांचा थरार

राज्यसभेत बीसीसीआयची कमाई पाहाता किती टॅक्स भरला गेला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर राज्य अर्धमंत्री पंकज चौधरी यांनी लिखित स्वरुपात या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

बीसीसीआयने 2021-22 या अर्थिक वर्षात 1,159 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. ही रक्कम गेल्यावर्षीच्या तुलनेत 37 टक्क्याने अधिक आहे.

बीसीसीआयने 2020-21 या अर्थिक वर्षात 844.92 कोटी टॅक्स भरला असून 2019-20 या अर्थिक वर्षात 882.29 कोटी टॅक्स भरला आहे.

BCCI
Sunil Dev Died: टी20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय टीमच्या मॅनेजरचे निधन, BCCI मध्येही सांभाळली मोठी जबाबदारी

बीसीसीआयने 2021-22 या वर्षात 7,606 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यातील 3,064 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

तसेच त्यापूर्वी 2020-21 वर्षात बीसीसीआयने 4,735 कोटी रुपयांची कमाई केली होती, तसेच 3,080 खर्च झाला होता.

दरम्यान, बीसीसीआयला आंतरराष्ट्रीय सामने, आयपीएल, मीडिया राईट्स, जाहीराती, स्पॉन्सर्स अशा विविध गोष्टींमधून महसूल मिळत असतो. त्यामुळे बीसीसीआय मोठ्या प्रमाणात कमाई करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com