Goa Cricket : गोव्यात यंदा BCCI चे 10 सामने; 23-24 मधील वेळापत्रक जाहीर

2023- 24 देशांतर्गत क्रिकेट मोसम: पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत भरगच्च वेळापत्रक
Goa Cricket Association
Goa Cricket AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cricket Association (जीसीए) २०२३-२४ मोसमात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्पर्धांतील एकूण दहा सामन्यांचे यजमानपद भूषविणार असून त्यापैकी सात लढती पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी या कालावधीत खेळल्या जातील. साहजिकच या कालावधीत जीसीए व्यस्त राहील.

गोव्याचा रणजी क्रिकेट संघ आगामी मोसमातील सातपैकी चार सामने घरच्या मैदानावर खेळेल. २३ वर्षांखालील संघाचे कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील तीन सामने गोव्यात होतील, तर १९ वर्षांखालील संघही कुचबिहार करंडक स्पर्धेतील तीन सामने होम मैदानावर खेळेल.

रणजी स्पर्धा व कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील सामने जानेवारी-फेब्रुवारीत समांतर खेळले जाणार असल्यामुळे एकावेळी दोन मैदाने जीसीएला सज्ज ठेवावी लागतील.

Goa Cricket Association
National Librarian's Day: आजच्या इंटरनेट काळातील ग्रंथालये

यंदा बलाढ्य संघांचे आव्हान

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यंदा गोव्यासमोर घरच्या मैदानावर पंजाब, तमिळनाडू, गुजरात या बलाढ्य संघांसह चंडीगडचेही प्रबळ आव्हान असेल. त्यामुळे होम मैदानावर त्यांच्याविरुद्ध खेळताना यजमान संघाचा कस लागण्याचे संकेत आहेत.

गतमोसमात फक्त एकच विजय

गतमोसमात रणजी करंडक, कर्नल सी. के. नायडू करंडक व कुचबिहार करंडक या तिन्ही स्पर्धा मिळून गोव्यात नऊ सामने झाले, पण त्यापैकी फक्त एकच सामना गोव्याला जिंकता आला, तर सहा पराभव पत्करावे लागले.

एकमेव विजय नोंदविताना नायडू करंडक स्पर्धेत गोव्याने सांगे येथे कमजोर अरुणाचल प्रदेशला डाव व २२९ धावांनी हरविले होते.

Goa Cricket Association
वृक्षारोपण, संस्कृती आणि देवराई

गोव्याचे २०२३-२४ मधील होम सामने

  • कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील (३)

    विरुद्ध चंडीगड (२४ नोव्हेंबरपासून), विरुद्ध त्रिपुरा (१ डिसेंबरपासून), विरुद्ध विदर्भ (१५ डिसेंबरपासून)

  • रणजी करंडक स्पर्धा (४)

    विरुद्ध चंडीगड (१२ जानेवारीपासून), विरुद्ध पंजाब (२६ जानेवारीपासून), विरुद्ध तमिळनाडू (२ फेब्रुवारीपासून), विरुद्ध गुजरात (१६ फेब्रुवारीपासून).

  • कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील (३)

    विरुद्ध केरळ (२१ जानेवारीपासून), विरुद्ध तमिळनाडू (४ फेब्रुवारीपासून), विरुद्ध राजस्थान (१८ फेब्रुवारीपासून)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com