IPL 2026 Fan Park Dainik Gomantak
क्रीडा

मोफत एन्ट्री अन् स्टेडियमचा फील! 'BCCI'चं क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट; IPL 2026 चे सामने 'या' 15 शहरांमध्ये पाहता येणार फ्री

IPL 2026 Fan Park: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहे.

Sameer Amunekar

IPL Free Screening Cities : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. २८ मार्चपासून या थराराला सुरुवात होत असून, सलामीचा सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. सामन्यांच्या तिकिटांसाठी चाहत्यांची मोठी ओढाताण सुरू असतानाच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चाहत्यांना एक खास 'रिटर्न गिफ्ट' दिले आहे. देशातील १५ शहरांमध्ये 'आयपीएल फॅन पार्क्स'चे आयोजन करण्यात येणार असून, येथे चाहत्यांना मोफत सामन्यांचा आनंद घेता येईल.

काय आहे 'फॅन पार्क'ची संकल्पना?

ज्या चाहत्यांना मैदानात जाऊन सामना पाहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी बीसीसीआय दरवर्षी फॅन पार्कची सोय करते. हे एक प्रकारचे 'मिनी स्टेडियम' असते. एका मोठ्या खुल्या मैदानात विशाल एलईडी (LED) स्क्रीनवर सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाते.

केवळ क्रिकेटच नव्हे, तर येथे फॅमिली झोन, किड्स झोन, फूड स्टॉल्स आणि जिओ सिनेमाचा खास एक्सपिरियन्स झोन देखील असतो. मित्र आणि कुटुंबासह स्टेडियमसारख्या वातावरणात जल्लोष करण्याची ही एक सुवर्णसंधी असते.

पहिल्या तीन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्यातील फॅन पार्क्सची यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या तीन आठवड्यांत ११ राज्यांमधील १५ शहरांमध्ये हे आयोजन केले जाईल.

  • पहिला आठवडा (२८-२९ मार्च): रोहतक, भोपाळ, तुमकुरु, नागपूर आणि कृष्णनगर.

  • दुसरा आठवडा (४-५ एप्रिल): मथुरा, जोधपूर, निजामाबाद, म्हैसूर आणि भुवनेश्वर.

  • तिसरा आठवडा (११-१२ एप्रिल): मेरठ, नडियाद, रत्नागिरी, कोईम्बतूर आणि राउरकेला.

यावेळेस महाराष्ट्रातील क्रिकेट चाहत्यांसाठी दुहेरी आनंद आहे. विदर्भातील नागपूर आणि कोकणातील रत्नागिरी या दोन शहरांची निवड फॅन पार्कसाठी करण्यात आली आहे. नागपुरात पहिल्याच आठवड्यात तर रत्नागिरीत तिसऱ्या आठवड्यात हे आयोजन होईल.

मोफत प्रवेश असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या या उपक्रमामुळे आयपीएलचा फिव्हर आता मेट्रो शहरांमधून छोट्या शहरांपर्यंत पोहोचणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT