BCCI India U19 Squad Dainik Gomantak
क्रीडा

BCCIचा मोठा निर्णय! सेहवाग, द्रविडच्या सुपुत्रांची टीम इंडियात ग्रँड एन्ट्री; संघाची धुरा कोणाच्या हाती?

BCCI India U19 Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया U19 संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघाची घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया U19 संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाची युवा टीम भारत दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामने आणि दोन मल्टी-डे सामने खेळणार आहे. या मालिकांसाठी निवड समितीने दोन वेगवेगळे भारतीय संघ जाहीर केले असून युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

या संघाच्या घोषणेनंतर सर्वाधिक चर्चा होत आहे ती दोन नावांची आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविड. भारताचे माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या मुलांना वनडे संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे या दोन्ही युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलियाची U19 टीम भारत दौऱ्यावर

ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघ भारतात तीन वनडे आणि दोन मल्टी-डे सामने खेळणार आहे. या मालिकेतील सामने राजकोट आणि अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आले आहेत. तीनही वनडे सामने तसेच पहिला मल्टी-डे सामना राजकोटमध्ये होणार आहे, तर दुसरा मल्टी-डे सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.

युवा खेळाडूंसाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटच्या वातावरणाशी जुळवून घेण्याबरोबरच दबावाच्या परिस्थितीत कामगिरी करण्याचा अनुभव या मालिकेतून त्यांना मिळणार आहे.

वनडे संघाची धुरा लक्ष्य रायचंदानीकडे

वनडे मालिकेसाठी भारतीय अंडर-19 संघाचे नेतृत्व लक्ष्य रायचंदानी याच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्याला यशबर्धन चौहान उपकर्णधार म्हणून साथ देणार आहे. विशेष म्हणजे मल्टी-डे सामन्यांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी बदलण्यात आली आहे. या सामन्यांमध्ये यशबर्धन चौहान कर्णधार असेल, तर लक्ष्य रायचंदानी उपकर्णधाराची भूमिका पार पाडेल. त्यामुळे दोन्ही युवा खेळाडूंना नेतृत्वाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

आर्यवीर सेहवागला वनडे संघात स्थान

वीरेंद्र सहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग याची भारतीय अंडर-19 वनडे संघात निवड झाली आहे. आर्यवीरने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची झलक दाखवली आहे. यंदाच्या दिल्ली प्रीमियर लीगमध्येही तो वेस्ट दिल्ली लॉयन्सकडून खेळताना दिसला होता.

सहवागच्या आक्रमक फलंदाजीची शैली क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. त्यामुळे आर्यवीरच्या खेळाकडे चाहत्यांचे लक्ष असणार असले तरी त्याच्यावर वडिलांच्या कामगिरीची तुलना करण्याचे दडपणही असू शकते. मात्र, युवा क्रिकेटमध्ये त्याला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची ही महत्त्वाची संधी आहे.

राहुल द्रविडचा मुलगा अन्वयही संघात

भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविड याचा मुलगा अन्वय द्रविड यालाही वनडे संघात स्थान मिळाले आहे. अन्वयची संघात विकेटकीपर म्हणून निवड करण्यात आली आहे.

राहुल द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून तसेच प्रशिक्षक म्हणून मोठे योगदान दिले आहे. आता त्याच्या मुलाला भारतीय अंडर-19 संघात संधी मिळाल्यामुळे द्रविड कुटुंबाचे भारतीय क्रिकेटशी असलेले नाते आणखी एका पिढीत पुढे जाताना दिसत आहे.

दोन्ही खेळाडू मल्टी-डे संघाबाहेर

आर्यवीर सहवाग आणि अन्वय द्रविड यांना वनडे संघात संधी मिळाली असली तरी दोघांचाही मल्टी-डे संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत या दोघांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल.

त्यांच्यासोबतच संघात अनेक प्रतिभावान युवा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आगामी काळातील भारतीय क्रिकेटसाठी हे खेळाडू महत्त्वाचे ठरू शकतात.

भारताची U19 वनडे टीम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशबर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल (विकेटकीपर), आर्यवीर सहवाग, व्ही.के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (विकेटकीपर), व्ही. यशवीर, रोहित यादव, शाविन विनोद, मोहित उलवा, चिगुरुपती वेंकट आणि काव्या पटेल यांचा समावेश आहे.

आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत युवा भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. विशेषतः आर्यवीर सहवाग आणि अन्वय द्रविड यांच्याकडून चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

बहु-दिवसीय सामन्यांसाठी भारताचा अंडर 19 संघ: यशवर्धन चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उप-कर्णधार), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), अभिप्रय बिस्वास (यष्टीरक्षक), रोहित अकंनव, रोहित, अकंण, प्रणय राघवेंद्र, प्रियांशू सिंग, मोहित उलवा, आर्यन यादव.

ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील भारत दौऱ्याचे वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना: १८ सप्टेंबर, २०२६, राजकोट (सकाळी ९ वाजता)

दुसरा एकदिवसीय सामना: २१ सप्टेंबर, २०२६, राजकोट (सकाळी ९ वाजता)

तिसरा एकदिवसीय सामना: २३ सप्टेंबर, २०२६, राजकोट (सकाळी ९ वाजता)

पहिला बहुदिवसीय सामना: २७-३० सप्टेंबर, २०२६, राजकोट (सकाळी ९:३० वाजता)

दुसरा बहुदिवसीय सामना: ५-८ ऑक्टोबर, २०२६, अहमदाबाद बी मैदान (सकाळी ९:३० वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

Government Employee Transfers: तलाठी, लिपिक, शिपाई आता राज्यभर बदलीसाठी पात्र? सावंत सरकारकडून 'कॉमन केडर' लागू

Voter Registration Rules: पत्ता बदलला, मतदारकी नाही! मग फॉर्म-6 कशाला? उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा आग्रह फेटाळला

Crime News: आधी पत्नीची हत्या, नंतर सासरच्या सहा जणांना संपवले! बंगळुरूमध्ये कॅबचालकाचा धक्कादायक कारनामा; पोलिसांकडून तपास सुरू

Cristiano Ronaldo Net Worth: फुटबॉलचा कुबेर! रोनाल्डो जगातील सर्वात महागडा ॲथलीट, क्रिकेटचा देव, किंग कोहली कुठेच नाहीत; नेटवर्थ जाणून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT