Goa Screenwriters Lab: महिलांच्या कथांना मिळणार चित्रपटाचे रूप; गोव्यात ‘स्क्रिनरायटर्स लॅब’ सुरू होणार

Goa Women Filmmakers Initiative: उपक्रमांतर्गत गोव्यात विशेष ‘स्क्रिनरायटर्स लॅब’ अर्थात पटकथा लेखन प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Goa Women Filmmakers Initiative
Goa Screenwriters LabDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: चित्रपटसृष्टीत महिलांचा सहभाग वाढविण्यासह त्यांच्या सर्जनशील कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गोव्यात ‘वुमेन इन फिल्म इंडिया’ (डब्ल्यूआयएफ इंडिया) या संस्थेसोबत भागीदारी करण्यात आली आहे.

या सहकार्याच्या माध्यमातून गोव्यातील महिला दिग्दर्शक, पटकथालेखक आणि चित्रपट क्षेत्रातील अन्य सर्जनशील व्यावसायिकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटसृष्टीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष दिलायला लोबो आणि ‘वुमेन इन फिल्म इंडिया’च्या कार्यक्रम विकास संचालक राबिया चोप्रा यांच्या उपस्थितीत गोवा मनोरंजन संस्था आणि वुमेन इन फिल्म इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत गोव्यात विशेष ‘स्क्रिनरायटर्स लॅब’ अर्थात पटकथा लेखन प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Goa Women Filmmakers Initiative
Goa Politics: प्रत्येक कुटुंबाला दरमहा 15 हजारांचा लाभ! सत्तेत येताच मोफत वीज देण्याचे 'आप'चे आश्वासन

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात महिलांना केवळ अभिनयापुरत्या मर्यादित न ठेवता पटकथा लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि चित्रपट प्रकल्पांचे नेतृत्व करण्याच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या भागीदारीमागील प्रमुख उद्देश आहे. अनेक महिलांकडे चित्रपटांसाठी वेगळ्या विषयांवर आधारित कथा आणि सर्जनशील कल्पना असतात. मात्र, योग्य मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ, तांत्रिक ज्ञान आणि चित्रपट उद्योगातील संपर्कांच्या अभावामुळे त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष चित्रपटाचे स्वरूप मिळत नाही. ही उणीव दूर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या भागीदारीमुळे गोव्यातील महिला चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखकांना देशातील तसेच परदेशातील अनुभवी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अन्य तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याबरोबरच चित्रपट निर्मितीतील बदलते प्रवाह, कथालेखनातील नवे प्रयोग, तांत्रिक बाबी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेतील संधी यांची माहिती मिळू शकणार आहे.

दरम्यान, गोव्यात चित्रपट आणि दृकश्राव्य क्षेत्रासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने ही भागीदारी महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक कथा, सांस्कृतिक परंपरा, सामाजिक वास्तव आणि महिलांचे अनुभव चित्रपटांद्वारे व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळू शकते. नवोदित महिला पटकथालेखक आणि दिग्दर्शकांना चित्रपट उद्योगातील तज्ज्ञांशी जोडल्यास त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल. तसेच महिला नेतृत्वाखालील चित्रपट प्रकल्पांना चालना मिळेल.

Goa Women Filmmakers Initiative
Goa Politics: काँग्रेसचे 'घर-घर चलो अभियान', मडगावातील संविधान बचाव सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पटकथा लेखनाला मिळणार प्राधान्य

‘स्क्रिनरायटर्स लॅब’मध्ये महिलांनी लिहिलेल्या कथांना विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. कथाबीजापासून पटकथेपर्यंतचा प्रवास, व्यक्तिरेखांची उभारणी, कथानक, संवादलेखन आणि चित्रपट सादरीकरणाच्या पैलूंवर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे कथा प्रत्यक्ष चित्रपट निर्मितीसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न होईल.

या उपक्रमात सर्जनशील निवास कार्यक्रम, कार्यशाळा, विशेष मार्गदर्शन सत्रे, मास्टरक्लासेस आणि नेटवर्किंग कार्यक्रमांचा समावेश असेल. या माध्यमातून सहभागी महिलांना अनुभवी व्यावसायिकांसोबत प्रत्यक्ष काम करण्याची आणि आपल्या संकल्पना अधिक प्रभावीपणे विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.