Ruturaj Gaikwad Dainik Gomantak
क्रीडा

Team India for Asian Games: ऋतुराजकडे टीम इंडियाची कॅप्टन्सी! BCCI ने एशियन गेम्ससाठी केली संघाची घोषणा

Ruturaj Gaikwad: बीसीसीआयने एशिनय गेम्ससाठी भारतीय संघाची निवड केली असून कर्णधारपदाची माळ ऋतुराजच्या गळ्यात पडली आहे.

Pranali Kodre

India Men squad for 19th Asian Games : चीनमध्ये यावर्षी होणाऱ्या 19 व्या एशियन गेम्समध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी निवड समितीने पूर्ण युवा संघ निवडला आहे.

या भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. तसेच अनेक युवा खेळाडूंचा यात समावेश आहे.

एशियन गेम्ससाठी निवडण्यात आलेल्या संघात यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा या युवा खेळाडूंसह शिवम दुबे, आवेश खान, अर्शदीप सिंग, रबी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर अशा भारताकडून यापूर्वी खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की एशियन गेम्स आणि वर्ल्डकप 2023 या स्पर्धांचा कालावधी साधारण एकत्र आल्याने वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी निवड न होणाऱ्या काही खेळाडूंना एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळेल. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की ही स्पर्धा खेळणारे खेळाडू भारतात होणाऱ्या 2023 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या मुख्य संघात नसतील.

तसेच एशियन गेम्समध्ये पुरुष क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान टी20 प्रकारात खेळली जाणार आहे.

एशियन गेम्ससाठी भारताचा पुरुष संघ

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक)

राखीव खेळाडू - यश ठाकूर, आर साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन

एशियन गेम्समध्ये तिसऱ्यांदा क्रिकेट

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 19 व्या एशियन गेम्सचे आयोजन गेल्यावर्षी सप्टेंबरदरम्यान होणार होते. पण चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याने ही स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात आली. एशियन गेम्समध्ये तिसऱ्यांदा क्रिकेटचे आयोजन होणार आहे.

यापूर्वी 2010 आणि 2014 साली एशियन गेम्समध्ये क्रिकेट खेळाचे आयोजन झाले होते. 2010 मध्ये बांगलादेशच्या पुरुष संघाने आणि पाकिस्तानच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 2014 मध्ये श्रीलंकेच्या पुरुष संघाने आणि पाकिस्तानच्या महिला संघाने सुवर्णपदक पटकावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT