Team India Dainik Gomantak
क्रीडा

भारतीय संघाची World Cup 2023 स्पर्धेसाठी घोषणा! रोहित कर्णधार, तर 'या' 15 खेळाडूंना संधी

India Squad for World Cup 2023: बीसीसीआयने वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केला आहे.

Pranali Kodre

BCCI Announced India Squad for ICC men's ODI Cricket World Cup 2023:

भारतात 5 ऑक्टोबर 2023 पासून वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी (5 सप्टेंबर) भारतीय संघाची घोषणा केली आहे.

भारतीय संघाच्या निवड समितीने वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी 15 जणांच्या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले आहे. तसेच हार्दिक पंड्या उपकर्णधार असणार आहे.

सध्या आशिया चषक स्पर्धा खेळण्यात व्यस्त असलेल्या भारतीय संघातील बऱ्याच खेळाडूंना वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठीही कायम करण्यात आले आहे. तसेच केएल राहुलही दुखापतीतून पूर्ण सावरला असल्याने त्यालाही वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे.

वर्ल्डकपपूर्वी केएल राहुल आशिया चषकातही सुपर फोर फेरीदरम्यान भारतीय संघाकडून पुनरागमन करताना दिसू शकतो. दरम्यान, केएल राहुल वर्ल्डकप 2023 स्पर्धेदरम्यान यष्टीरक्षण करतानाही दिसू शकतो.

केएल राहुलसह वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी यष्टीरक्षक म्हणून इशान किशनला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर फलंदाजी फळीत शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव असे खेळाडू आहेत.

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात असलेल्या तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन यांना वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी संधी मिळालेली नाही. फिरकीपटू युजवेंद्र चहललाही वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी संधी देण्यात आलेली नाही. त्याचा आशिया चषकासाठीही भारताच्या संघात समावेश नव्हता.

वर्ल्डकपसाठी गोलंदाजी फळीत फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला पसंती देण्यात आली आहे. तसेच रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडूही फिरकी गोलंदाजीत योगदान देतील. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांची निवड झाली आहे.

वर्ल्डकपसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

दहा संघात रंगणार थरार

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे 10 संघ खेळणार आहेत. या 10 संघात मिळून 10 सराव सामने आणि मुख्य स्पर्धेतील 48 सामने असे मिळून एकूण 58 सामने 12 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.

सराव सामने 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद या ठिकाणी रंगणार आहेत. त्यानंतर 5 ऑक्टोबरपासून मुख्य स्पर्धेला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने सुरुवात होईल.

मुख्य स्पर्धेतील सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरात होणार आहेत. या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत.

त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे उपांत्य सामने होती. तसेच 19 नोव्हेंबरला अंतिम सामना अहमदाबादला होईल.

भारतीय संघाचे 2023 वर्ल्डकपमधील साखळी फेरीचे वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 14 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, मुंबई

  • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 12 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, बंगळुरू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT