Perth Scorchers  Dainik Gomantak
क्रीडा

BBL 2023: पर्थ स्कॉचर्सने जिंकली बिग बॅश लीग, पाचव्यांदा ट्रॉफीवर कब्जा

Perth Scorchers: ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सने बिस्बेन हीटचा पाच गडी राखून पराभव करुन पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली.

Manish Jadhav

BBL 2023: ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सने बिस्बेन हीटचा पाच गडी राखून पराभव करुन पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. या विजयासह पर्थ स्कॉचर्स संघ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. बिग बॅश लीगच्या 12व्या हंगामाचा अंतिम सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर (Stadium) खेळला गेला.

दरम्यान, या सामन्यात बिस्बेन हीट संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बिस्बेन हीट संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात पर्थ स्कॉचर्स संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना 19.2 षटकांत 5 गडी गमावून 178 धावा केल्या आणि सामना जिंकला.

तसेच, पर्थ स्कॉचर्स आता बीबीएलमधील ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी त्यांचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी सिडनी सिक्सर्सला मागे टाकले, ज्यांनी 4 विजेतेपद जिंकले आहेत. ते गतविजेते देखील होते. दोनदा त्यांच्या विजेतेपदाचे रक्षण करणारा एकमेव संघ बनला. पर्थ संघाने यापूर्वी 2013-14 आणि 2014-15 मध्ये विजेतेपद पटकावले होते.

सामना कसा होता

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या डावात ब्रिस्बेन हीटच्या संघाने दमदार सुरुवात केली, परंतु 25 धावांवर त्यांनी पहिली विकेट गमावली. यानंतर सॅम हेझलेट आणि नॅथन मॅकस्विनी यांनी डाव सावरला आणि संघाला 100 धावांच्या पुढे नेले. सॅम हेझलेट 34 धावा करुन 104 धावांवर बाद झाला. तर मॅक्स ब्रायंटने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढवली पण तो बाद झाल्यानंतर कोणताही फलंदाज विशेष काही करु शकला नाही आणि संघाला 175 धावांपर्यंत मजल मारता आली.

तर, सामन्याच्या दुसऱ्या डावात पर्थ स्कॉचर्स संघाची चांगली सुरुवात झाली. स्टीफन एस्किनाझी आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांनी सुरुवात केली, परंतु ब्रिस्बेनने सामन्यात परतफेड करत दोन्ही सलामीवीरांना 48 धावांवर बाद केले. एका वेळी संघाने 7.5 षटकांत 54 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. पण संघाचा कर्णधार अ‍ॅश्टन टर्नर एका बाजून संघाला सावरले होते. त्याने आव्हानाचा पाठलाग करत अर्धशतक झळकावले. शेवटी निक हॉब्सन आणि कूपर कॉनोली यांनी पर्थला विजय मिळवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

SCROLL FOR NEXT