BAN vs AFG Dainik Gomantak
क्रीडा

BAN vs AFG: कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशने गाठला मोठा टप्पा, कसोटी इतिहासातील 'हे' पाच सर्वात मोठे विजय!

BAN vs AFG: बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशने 546 धावांच्या फरकाने विजय मिळवला.

Manish Jadhav

BAN vs AFG: बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशने 546 धावांच्या फरकाने विजय मिळवला. हा विजय बांगलादेशसाठी खूप महत्त्वाचा ठरतो, कारण कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. सर्वात मोठा विजय मिळवण्याच्या बाबतीत बांगलादेश आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

कसोटी इतिहासातील पाच सर्वात मोठे विजय

दरम्यान, 1928 मध्ये इंग्लंडने (England) ऑस्ट्रेलियाचा 675 धावांनी पराभव केला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय मानला जातो. हा विक्रम आजतागायत मोडता आलेला नाही. मात्र, 1928 मध्ये झालेल्या पराभवाचा बदला ऑस्ट्रेलियाने1934 मध्ये घेतला होता. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 562 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.

दुसरीकडे, आज बांगलादेशने (Bangladesh) अफगाणिस्तानवर 546 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर हा कसोटी क्रिकेट इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

त्याचबरोबर, 1911 मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 530 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा चौथा सर्वात मोठा विजय आहे.

तसेच, 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कांगारुंकडून 1911 च्या पराभवाचा बदलाही घेतला. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 492 धावांनी पराभव केला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा पाचवा सर्वात मोठा विजय आहे.

अफगाणिस्तानचे फलंदाज धावा करु शकले नाहीत

दरम्यान, या सामन्यात बांगलादेशने सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानवर वर्चस्व राखले. बांगलादेशने आपल्या दोन्ही डावात 382 आणि 425 धावा केल्या.

तर दुसरीकडे, अफगाणिस्तान सामन्यात कुठेच दिसला नाही. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 146 धावा तर दुसऱ्या डावात केवळ 115 धावा करु शकला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांना मोठी खेळी खेळता आली नाही.

बांगलादेशच्या शांतोंने दोन शतके झळकावली

या सामन्यात बांगलादेशचा फलंदाज नजमुल हुसेन शांतोची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. त्याने दोन्ही डावात शानदार शतक झळकावले. शांतोने पहिल्या डावात 146 तर दुसऱ्या डावात 124 धावा केल्या. याशिवाय, मोईनुल हकनेही दुसऱ्या डावात 121 धावांची खेळी खेळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ..बऱ्या बोलाने 2 कोटी रुपये द्या! 'वॉल्टर' नावाचा धाक दाखवून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; संशयितांविरुद्ध तक्रार दाखल

Dhirio in Goa: ‘धीरयो’वरून सरकार पेचात! परंपरा की कायदा? आता न्‍यायालयात ‘कसोटी’

Rashi Bhavishya 19 August 2025: नोकरीत बदलाची शक्यता, प्रवासाचे योग; मोठे निर्णय घाईघाईने घेऊ नका

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT