IND vs BAN: बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला वनडे मालिकेनंतर यजमानांबरोबर २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी १७ जणांच्या बांगलादेश संघाची निवड झाली आहे.
ही मालिका १४ डिसेंबरपासून सुरू होणार असून पहिला सामना जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चटगाव येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी निवड झालेल्या बांगलादेश संघात झाकीर हसन याला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.
त्याने नुकत्याच झालेल्या भारतीय अ संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याला या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश अ संघ पराभूत झाला असला, तरी त्याने केलेल्या १७३ धावांच्या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. आता त्याला त्याच्या या कामगिरीचे बक्षीस म्हणून बांगलादेशच्या राष्ट्रीय संघातही संधी मिळाली आहे.
(Bangladesh announced squad for the first Test against India)
मात्र, तमिम इक्बाल पहिल्या सामन्याला मुकणार आहे. तो अजूनही मांडीच्या दुखापतीतून सावरलेला नाही. या दुखापतीमुळे त्याला भारताविरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकावे लागले होते.
पण, वेगवान गोलंदाज तस्किन अहमद, मुशफिकुर रहीम आणि यासिर अली यांचे बांगलादेश संघात पुनरागमन झाले आहे.
दरम्यान, भारताने यापूर्वीच कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. पण रोहित शर्माला वनडे मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे आणि मोहम्मद शमीलाही दुखापत असल्याने त्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना २२ ते २६ डिसेंबर दरम्यान होईल. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे.
बांगलादेश संघ : महमुदुल हसन जॉय, नजमुल हुसेन शांतो, मोमिनुल हक, यासिर अली, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, नुरुल हसन, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, खालेद अहमद, इबादोत हुसेन, शोरीफुल इस्लाम, झाकीर हसन, रेजौर रहमान राजा, अनामूल हक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.