Football Tournament  Dainik Gomarantak
क्रीडा

डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत बंगळूर एफसीला विजेतेपद

अखेरच्या साखळी सामन्यात केरळा ब्लास्टर्सशी बरोबरी

दैनिक गोमन्तक

पणजी: बंगळूर एफसीने अपराजित राहताना अखेरच्या साखळी लढतीत केरळा ब्लास्टर्सला गोलशून्य बरोबरीत रोखून गुरुवारी रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (Bangalore FC wins Development League Football Tournament )

बाणावली येथील मैदानावर झालेल्या लढतीत विजेतेपदासाठी बंगळूर एफसीला बरोबरीचा एक गुण पुरेसा होता. अगोदरच्या सहाही लढतीत विजय मिळविलेल्या बंगळूरने संधी गमावली नाही. गुरुवारी एक गुण मिळाल्यामुळे त्यांचे स्पर्धेत सर्वाधिक 19 गुण झाले. दुसऱ्या स्थानी राहिलेल्या केरळा ब्लास्टर्सचे 16 गुण झाले. हे दोन्ही संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या युवा संघांच्या ‘नेक्स्टजन कप’ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

स्पर्धेतील आणखी एका लढतीत नागोवा येथील मैदानावर हैदराबाद एफसीने भरपाई वेळेतील गोलमुळे जमशेदपूर एफसीला 1-0 फरकाने हरविले. निर्णायक गोल 90+1व्या मिनिटास अब्दुल राबी याने नोंदविला. स्पर्धेतील चौथ्या विजयामुळे हैदराबादचे 13 गुण झाले. एफसी गोवाचेही तेवढेच गुण झाले. गोलसरासरीत हैदराबादला (+5) तिसरा, तर एफसी गोवास (+1) चौथा क्रमांक मिळाला.

खेळाडूंच्या दर्जाची चाचपणी : मूसा

डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेमुळे खेळाडूंचा दर्जा व क्षमतेची चाचपणी करता आली. केवळ खेळाडूच नव्हे, तर प्रशिक्षकांसाठीही चांगले स्पर्धात्मक व्यासपीठ लाभले. सारेच संघ तुल्यबळ होते. प्रतिस्पर्धी केरळा ब्लास्टर्सनेही चांगला खेळ केला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी बजावली, अशी प्रतिक्रिया विजेत्या बंगळूरचे प्रशिक्षक नौशाद मूसा यांनी सामन्यानंतर दिली.

वैयक्तिक विजेते

- गोल्डन बूट (सर्वाधिक गोल) :राहुल राजू, ७ गोल (बंगळूर एफसी)

- गोल्डन बॉल (स्पर्धेचा मानकरी) :बेके ओरम (बंगळूर एफसी)

- गोल्डन ग्लोव्ह (उत्कृष्ट गोलरक्षक) :सचिन सुरेश (केरळा ब्लास्टर्स)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Majorda: धिरयोत उधळला रेडा, छातीत खुपसले शिंग; माजोर्डा मृत्यूप्रकरणातील संशयित अमेरिकेत, पोलिसांच्या वाढल्या अडचणी

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bhai Dooj 2025: '7 रंगांचे तिलक, न कोमेजणारा हार'; नेपाळमध्ये कशी साजरी होते भाऊबीज? जाणून घ्या आगळीवेगळी प्रथा..

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

SCROLL FOR NEXT