जीसीए प्रीमियर लीग: स्नेहलने धेंपो क्लबला सावरले

जीनोविरुद्धच्या अंतिम लढतीत 5 बाद 214 धावा
GCA Premier League
GCA Premier LeagueDainik Gomantk
Published on
Updated on

पणजी : अनुभवी स्नेहल कवठणकरच्या समयोचित अर्धशतकी खेळीमुळे जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत धेंपो क्रिकेट क्लबला सावरता आले. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर त्यांनी जीनो क्रिकेट क्लबविरुद्ध 5 बाद 214 धावा केल्या. (GCA Premier League: Snehal saves Dhempo Club )

GCA Premier League
MS Dhoni: IPL 2022 नंतर धोनी करणार मोठी घोषणा

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सामना सुरू आहे. रात्री पडलेल्या पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ गुरुवारी उशिरा सुरू झाला. दिवसभरात 57 षटकांचाच खेळ झाला. जीनो क्लबने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर धेंपो क्लबची सुरवात डळमळीत होती. 115 चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह 79 धावा केलेल्या स्नेहलमुळे त्यांना सावरता आले.

GCA Premier League
सैनिक व्हायचे होते, नशिबाने बनवले क्रिकेटर, दिल्ली कॅपिटल्सच्या मॅचविनरची कहाणी

स्नेहलने कीनन वाझ ( 37) याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. नंतर अझीम काझी ( नाबाद 37) याच्यासह पाचव्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी करून संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला. दिवसातील चार षटकांचा खेळ बाकी असताना स्नेहलला मोहित रेडकरने यष्टिरक्षक समर दुभाषी याच्याकरवी झेलबाद केले. जीनो क्लबतर्फे ऋत्विक नाईक व प्रज्ञेश गावकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव : 57 षटकांत 5 बाद 214 ( करण वशोदिया 14, मनीष काकोडे 18, जय आहुजा 17, स्नेहल कवठणकर 79, कीनन वाझ 37, अझीम काझी नाबाद 37, योगेश कवठणकर नाबाद 3, ऋत्विक नाईक 2-56, प्रज्ञेश गावकर 2-42, मोहित रेडकर 1-33 )

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com