Bangalore FC & Chennai FC Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: बंगळूरुने चेन्नईयीनचा उडवला धुव्वा

माजी विजेत्या बंगळूर एफसीने आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत दोन वेळच्या विजेत्या चेन्नईयीन एफसीचा 3-0 फरकाने धुव्वा उडविला.

किशोर पेटकर

पणजी: माजी विजेत्या बंगळूर एफसीने आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत दोन वेळच्या विजेत्या चेन्नईयीन एफसीचा 3-0 फरकाने धुव्वा उडविला. बुधवारी बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झालेल्या लढतीत उदांता सिंग याने दोन गोल केला. (Bangalore FC Defeated Chennai FC In The Indian Super League Football Tournament)

बंगळूर एफसी (Bengaluru FC) आता सलग सात सामने अपराजित आहे. या कालावधीत त्यांनी तीन विजय व चार बरोबरी नोंदविल्या आहेत. बुधवारच्या लढतीत त्यांना इराणच्या इमान बसाफा याने पेनल्टी फटक्यावर 12व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. बसाफाचा हा पहिलाच आयएसएल गोल ठरला. नंतर उदांता याने अनुक्रमे 42 व 52व्या मिनिटास गोल करून चेन्नईयीनच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. या 25 वर्षीय आघाडीपटूने आता यंदाच्या स्पर्धेत तीन गोल केले आहेत.

बंगळूरचा हा 13 लढतीतील चौथा विजय ठरला. 17 गुणांसह त्यांनी सहावा क्रमांक मिळविला. ओडिशाचेही त्यांच्याइतकेच गुण आहेत. मात्र गोलसरासरीत बंगळूरने (+4) ओडिशाला (-4) मागे टाकले. चेन्नईयीनला पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 13 लढतीनंतर 18 गुणांसह ते पाचव्या क्रमांकावर कायम राहिले.

बंगळूरची दमदार आघाडी

चेन्नईयीनच्या एडविन वन्सपॉल याने गोलक्षेत्रात सुनील छेत्रीस अडथळा आणल्यानंतर रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली. यापूर्वी स्पर्धेत छेत्री दोन वेळा पेनल्टी फटका मारताना चुकला आहे, त्यामुळे स्पॉट किकवर नेम साधण्याची जबाबदारी बसाफाने यशस्वीपणे निभावली व बंगळूरला आघाडी मिळाली. दुसऱ्या गोलमध्येही छेत्रीचेच योगदान राहिले. यावेळी गोलनेटसमोर गोलरक्षक देबजित मजुमदार एकटाच असताना छेत्रीने स्वतः फटका न मारता उदांताला पास दिला. यावेळी गोल करताना उदांताला श्रम घ्यावे लागले नाहीत. विश्रांतीनंतर लगेच उदांताने आयएसएल स्पर्धेतील वैयक्तिक अकरावा गोल नोंदवत बंगळूरची स्थिती भक्कम केली. उदांताने चेन्नईयीनचा बचावपटू महंमद साजिद धोत याच्यावर दबाव टाकत मुसंडी मारली. नंतर आणखी एक बचावपटू स्लाव्हको दाम्यानोविच याचा तोल गेल्याची संधी साधत उदांताने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल केला.

सदर्न डर्बीत बंगळूरचे वर्चस्व

बंगळूर एफसीने चेन्नईयीनवर सलग दुसरा विजय नोंदविला आहे. पहिल्या टप्प्यातही त्यांनी 4-2 फरकाने विजय मिळविला होता. दक्षिण भारतातील या संघातील सदर्न डर्बीत बंगळूरने वर्चस्व राखले. एकंदरीत या दोन्ही संघांतील 11 आयएसएल लढतीत बंगळूरचा हा सहावा विजय ठरला. चेन्नईयीनने तीन विजय मिळविले असून दोन सामने बरोबरीत राहिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT