Bangalore beat Odisha to reach ISL semifinals Dainik Gomantak
क्रीडा

विजयामुळे बंगळूर एफसीची आशा पल्लवित

ओडिशाला नमवून आयएसएल उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल

दैनिक गोमन्तक

पणजी : ओडिशा एफसीला नमविल्यामुळे बंगळूर एफसीची आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याबाबत आशा पल्लवित झाली. माजी विजेत्यांनी सोमवारी बांबोळी येथील अॅथलेटिक स्टेडियमवर 2-1 फरकाने विजय मिळविला.

बंगळूर एफसीसाठी दानिश फारुख याने 31व्या मिनिटास बरोबरीचा गोल केल्यानंतर, 49व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने आघाडीचा गोल केला. त्यापूर्वी आठव्या मिनिटास नंधकुमार सेकर याने ओडिशाचे गोलखाते उघडले होते.

बंगळूरचा हा 18 लढतीतील सातवा विजय ठरला. त्यांचे आता 26 गुण झाले, त्यामुळे पाचवा क्रमांक मिळाला. पराभवामुळे ओडिशा एफसीच्या उपांत्य फेरीच्या शक्यतेला जोरदार धक्का बसला. 18 लढतीत त्यांनी आठवा सामना गमावला. त्यामुळे 22 गुण व सातवा क्रमांक कायम राहिला. पहिल्या टप्प्यात त्यांनी बंगळूरला 3-1 फरकाने नमविले होते, मात्र सोमवारी मागील निकालाची पुनरावृत्ती भुवनेश्वरच्या संघाला करता आली नाही.

पूर्वार्धात गोलबरोबरी

पूर्वार्धात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. जोनाथस ख्रिस्तियन याच्या रिबाऊंडवर नंधकुमार सेकर याने मोसमातील पहिला गोल नोंदवत ओडिशा एफसीला आघाडीवर नेले. अर्ध्या तासाच्या खेळानंतर बंगळूरची सेटपिसेस व्यूहरचना सरस ठरली व त्यांना बरोबरी साधता आली. रोशन नाओरेम याच्या शानदार कॉर्नर फटक्यावर दानिश फारुख याचे हेडिंग भेदक ठरले. त्याचा हा मोसमातील तिसरा गोल ठरला. पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत नंधकुमारने नेटसमोर कोणीच नसताना सोपी संधी गमावल्यामुळे ओडिशाला (Odisha) पुन्हा आघाडी घेता आली नाही.

क्लेटनचा पेनल्टी गोल

बंगळूरला (Bangalore) विश्रांतीनंतर लगेच पेनल्टी फटका मिळाला. यावेळी ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने गोलरक्षक कमलजित सिंगचा अंदाज चुकवत बंगळूरला आघाडीवर नेले. ब्राझीलियन खेळाडूचा हा मोसमातील नववा गोल ठरला. नंतर लगेच रिबाऊंडवर ब्रुनो सिल्वा याचा फटका क्रॉसबारला आपटल्यामुळे बंगळूरच्या खाती तिसऱ्या गोलची भर पडू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT