Posco Act : गोव्यात 'फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट'ची स्थापना

पॉस्को कायद्याखालील प्रकरणांचा जलदगतीने लागणार निकाल
Posco Act Durga V Madkaikar
Posco Act Durga V MadkaikarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मडगावच्‍या अतिरिक्त सत्र न्यायाधीश दुर्गा व्ही. मडकईकर यांची बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो) विशेष द्रुतगती न्यायालयाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीच्या आदेशाची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने (court) काढली आहे. त्यांनी आज या नव्या पदाचा ताबा घेतला. या कायद्याखाली गोव्यात (goa) दाखल होणाऱ्या गुन्ह्यांवरील सुनावणी त्यांच्या न्यायालयासमोर होणार आहे.

Posco Act Durga V Madkaikar
टपाली मतांमुळे निवडणुकीलाच गालबोट?

न्यायालय जुन्या न्यायालयाच्या इमारतीत सुरू करण्यात आले आहे. न्यायालयाकडे गोव्यातील संपूर्ण क्षेत्राचा अधिकार देण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या न्यायालयाची गरज होती. सरकारने (Government) ते स्थापन केल्याबद्दल पीडितांना मदत करणारे समाजकार्यकर्ते इमीडिओ पिन्हो यांनी समाधान व्यक्त केले आहे. 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचार प्रकरणांवर बालन्यायालयात खटले चालवले जात होते. मात्र 16 ते 18 वर्षांपर्यंतच्या पीडितांवरील गुन्ह्यांचे खटले पोक्सो (pocso) कायद्याखाली चालवण्यासाठी विशेष न्यायालय नव्हते. या नव्याने स्थापन झालेल्या न्यायालयामुळे प्रलंबित असलेले खटले लवकर निकाली काढले जातील व पीडित मुलांना लगेच न्याय मिळेल असे पिन्हो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com