Shakib Al Hasan Dainik Gomantak
क्रीडा

BAN vs IRE: शाकिब अल हसनने रचला इतिहास, बनला जगातील नंबर 1 गोलंदाज

BAN vs IRE: बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार शकिब अल हसनने इतिहास रचला आहे.

Manish Jadhav

BAN vs IRE: बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार शकिब अल हसनने इतिहास रचला आहे. बुधवारी आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शकीबने पॉवरप्लेमध्ये 5 विकेट घेत एक मोठा विक्रम केला.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा जगातील नंबर 1 गोलंदाज

शाकिब टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा जगातील नंबर 1 गोलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत न्यूझीलंडचा (New Zealand) गोलंदाज टीम साऊदीला मागे टाकले आहे. साऊदीच्या 107 सामन्यात 134 विकेट्स आहेत. 135वी विकेट घेताच शाकिबने त्याला मागे टाकले. शाकिबच्या नावावर 114 सामन्यात 136 विकेट आहेत.

T20 कारकिर्दीत 450 पेक्षा जास्त विकेट

यासह शाकिबच्या टी-20 कारकिर्दीत 450 हून अधिक विकेट्स आहेत. या बाबतीत तो जगातील पाचवा गोलंदाज आहे. वेस्ट इंडिजचा (West Indies) गोलंदाज ड्वेन ब्राव्होने टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 615 विकेट्स आहेत. त्याने एकूण 4 षटकात 22 धावा देत 5 बळी घेतले.

5 विकेट घेतल्या

त्याने आपल्या पहिल्या आणि डावातील दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लॉर्कन टकरची विकेट घेत आपला जलवा दाखवून दिला. यानंतर चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने रॉस एडेअरला बाद केले. त्याच षटकातील सहाव्या चेंडूवर शाकिबने गारथ डेलानीला लिटन दासकरवी झेलबाद करुन पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

तसेच, दोन षटकांत 3 बळी घेणाऱ्या शाकिबमध्ये उत्साह संचारला. तो आता कुठे थांबणार होता? यातच पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकायला शकीब आला.

सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जॉर्ज डॉकरेलला एलबीडब्ल्यू करुन शकीबने आयर्लंडची कंबर मोडली आणि सहाव्या चेंडूवर हॅरी टेक्टरला बोल्ड केले. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शकीबने दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT