Paul Stirling  Dainik Gomantak
क्रीडा

BAN vs IRE: पॉल स्टर्लिंगची तूफानी खेळी, बाबर आझमला देणार जोर का झटका!

BAN vs IRE: बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या तिसऱ्या सामन्यात आयर्लंडने दणदणीत विजय नोंदवला.

Manish Jadhav

BAN vs IRE: बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या तिसऱ्या सामन्यात आयर्लंडने दणदणीत विजय नोंदवला.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर शुक्रवारी झहूर अहमद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात आयर्लंडने शानदार पुनरागमन केले. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 19.2 षटकांत 124 धावांत गारद झाला.

बाबर आझमच्या फक्त 80 धावांनी मागे आहे

यानंतर आयर्लंड संघाचा सलामीवीर आणि कर्णधार पॉल स्टर्लिंगने असे वादळ निर्माण केले की, संघाने अवघ्या 14 षटकांत विजय मिळवला.

पॉलने 41 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार मारले आणि 187.80 च्या स्ट्राईक रेटने 77 धावा केल्या. तर हॅरी टेक्टरने 14 आणि कर्टिस कॅम्फरने 16 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

दुसरीकडे, त्याच्या 77 धावांच्या धडाकेबाज खेळीसह, पॉल स्टर्लिंग T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला.

त्याच्या नावावर 124 सामन्यात 3275 धावा आहेत. विशेष म्हणजे तो चौथ्या क्रमांकावर असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमपेक्षा फक्त 80 धावांनी मागे आहे.

या बाबतीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) 4008 धावांसह अव्वल स्थानावर आहे. रोहित शर्मा 3853 धावांसह दुसऱ्या तर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल 3531 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

शमीम हुसेनची अर्धशतकी खेळी

या सामन्यात शमीम हुसेनने बांगलादेशसाठी (Bangladesh) संकटकाळात सर्वोत्तम खेळी खेळली. त्याने 42 चेंडूत 51 धावा केल्या. लिटन दास 5, मागील सामन्यांमध्ये वादळ निर्माण करणारा रोनी तालुकदार 14 धावा करुन बाद झाला.

तर नजमुल हुसेन शांतो 4, शाकिब अल हसन 6 आणि तौहीद हृदय 6 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतले. आयर्लंडचा गोलंदाज मार्क एडेअरने 4 षटकांत 25 धावांत 3 आणि मॅथ्यू हम्फ्रेजने 2 षटकांत 10 धावांत 2 बळी घेतले.

उर्वरित गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. बांगलादेशमध्ये आता 4 एप्रिलपासून आयर्लंड यांच्यात कसोटी खेळली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT