18-member Indian wrestling squad for Asian Games : सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 दरम्यान चीनमध्ये 19 वी एशियन गेम्स स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघातील खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर अनेक वाद समोर आले आहेत. अखेर यानंतर 18 खेळाडूंची अंतिम निवड झाली आहे.
दिल्लीतील केदार जाधव हॉलमध्ये शनिवारी आणि रविवारी एशियन गेम्समधील निवडीसाठी ट्रायल्स घेण्यात आले होते. त्यानंतर 18 खेळाडूंची निवड झाली. यात ग्रीको-रोमन, महिला आणि पुरुष फ्री-स्टाईल अशा तिन्ही विभागात प्रत्येकी 6 कुस्तीपटूंचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान या ट्रायल्समधून बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना ट्रायल्समधून सुट देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना एशियन गेम्ससाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे.
बजरंग पुनियाला पुरुषांच्या फ्री-स्टाईल 65 किलो वजनी गटातून, तर विनेशला महिला 53 किलो वजनी गटातून थेट प्रवेश देण्यात आला आहे. याच कारणावरून कुस्तीविश्वात मतमतांतरे पाहायला मिळाली आहेत. त्याबद्दल न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जरी बजरंग आणि विनेश यांना थेट प्रवेश देण्यात आला असला तरी त्यांच्या गटासाठीही ट्रायल्स घेण्यात आल्या, तसेच या गटांमधून निवड झालेल्या खेळाडूंना राखीव खेळाडू म्हणून जागा मिळाली आहे.
बजरंग पुनियाचा समावेश असलेल्या पुरुषांच्या फ्री-स्टाईल 65 किलो वजनी गटातून विशाल कालिरमनला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले, तसेच न्यायालयाच याचिका दाखल करणारी 19 वर्षांची अंतिम पांघल विनेश फोगटचा समावेश असेलेल्या 53 किलो वजनी गटातून राखीव खेळाडू म्हणून असेल.
या ट्रायल्समधून सर्वात मोठा चकीत करणारा निकाल पाहायला मिळाला, तो म्हणजे ऑलिम्पिक पदक विजेत्या रवी दहिया एशियन गेम्ससाठी पात्र ठरू शकला नाही. त्याला पहिल्याच फेरीत महाराष्ट्राच्या अतिश तोडकरने 57 किलो वजनी गटात पराभूत केले.
पण अतिशला उपांत्य फेरीत अमन सेहरावतने पराभूत केले. अमनने अंतिम सामन्यात विजय मिळवत आपली जागा पक्की केली.
तसेच आणखी चकीत करणारा निकाल म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील पदक विजेती सरिता मोर आणि अंशू मलिक यांनाही महिलांच्या 57 किलो वजनी गटातून एशियन गेम्सची पात्रता मिळवता आली नाही.
ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक या ट्रायल्ससाठी उपस्थित नव्हती, त्यामुळे ती एशियन गेम्समध्ये खेळणार नाही.
ग्रीको रोमन - ज्ञानेंदर (60 किलो), नीरज (67 किलो), विकास (77 किलो), नरिंदर चीमा (97 किलो), नवीन (130 किलो)
महिला फ्रीस्टाइल - पूजा गेहलोत (50किलो), विनेश फोगट (53 किलो) , मानसी अहलावत (57 किलो), सोनम मलिक (62 किलो), राधिका (68 किलो), किरण (76 किलो)
पुरुष फ्रीस्टाइल -अमन सेहरावत (57 किलो), बजरंग पुनिया (65 किलो), यश (74 किलो), दीपक पुनिया (86 किलो), विकी (97 किलो), सुमित (125 किलो)
राखीव खेळाडू - अंतिम पंघल (महिला फ्रीस्टाईल 53 किलो), विशाल कालीरामन (पुरुष फ्रीस्टाईल 65 किलो)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.