Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक छळ प्रकरणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना जामीन मिळाला आहे. त्यांना गुरुवारी दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला.
न्यायालयाने त्यांना जामीन देताना न्यायालयाला कळवल्याशिवाय परदेश दौऱ्यावर जाता येणार नाही, अशी अट घातली आहे. ब्रिजभूषण यांच्या जामीनाबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आम्ही याच्या विरोधात किंवा बाजूनेही नाही.
याआधी राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने सकाळीच सुनावणी घेऊन जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर ठीक 4 वाजता कोर्टाने कामकाज सुरु केले आणि ब्रिजभूषण यांना या प्रकरणात नियमित जामीन देण्याचा निर्णय सुनावला.
दरम्यान, 18 जुलै रोजीच न्यायालयाने (Court) ब्रिजभूषण यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. आता त्यांना मोठा दिलासा मिळाला असून लैंगिक छळ प्रकरणात त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.
आरोपपत्र दाखल होईपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याची गरज नव्हती, तेव्हा आता त्याची काय गरज आहे, असे त्यांच्या वकिलांनी म्हटले होते. त्याचाच आधार घेत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
ब्रिजभूषण यांच्याशिवाय त्यांचे निकटवर्तीय आणि कुस्ती महासंघाचे माजी पदाधिकारी विनोद तोमर यांनाही दिलासा मिळाला आहे. त्यांना एकूण 6 पैकी 2 प्रकरणांमध्ये सहआरोपीही करण्यात आले आहे.
ब्रिजभूषण यांना अटक न करण्याचे कारण दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) चार्जशीटमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे. ब्रिजभूषण यांनी सूचनांचे पालन केले आणि तपासात सहभागी झाले.
पोलिसांचे म्हणणे आहे की, ब्रिजभूषण आणि विनोद तोमर यांच्यावर 'अटक न करता' खटल्यासाठी आरोप ठेवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, 7 वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक केली जाणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.