नंदू नाटेकर Dainik Gomantak
क्रीडा

नंदू नाटेकर यांचे निधन; बॅडमिंटन मधला तारा निखळला

माजी बॅडमिंटनपटू (Badminton) अर्जुन पुरस्कार विजेते नंदू नाटेकर (Nandu Natekar) यांचं आज पुण्यात निधन झालं

Akshay Badwe

भारताचे माजी बॅडमिंटनपटू (Badminton) आणि अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) विजेते नंदू नाटेकर (Nandu Natekar) यांचे आज सकाळी पुण्यात वृद्धफकाळाने निधन झाले. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(Nandu Natekar passes away at 88 in Pune)

नाटेकर यांचे मूळ गाव सांगली मात्र त्यांनी आपलं शिक्षण मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयातून घेतलं. बॅडमिंटन क्रिडाप्रकारात त्यांनी भाराताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर भूषवलं. आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा मान पटकावत त्यांनी भारताला बॅडमिंटन या खेळाची एक वेगळी ओळख देखील करून दिली.

बॅडमिंटनचे दैवत म्हुणुन ओळख असलेले नाटेकर यांनी 15 वर्षांच्या कारकिर्दीत 100 पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या. त्यांनी 17 राष्ट्रीय विजेतेपदांचा पटकावले आहेत. 1954 मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेत सहभाग घेतला होता ज्यात त्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. देशाबाहेर विजेतेपद मिळवणारे नंदू नाटेकर पहिले बॅडमिंटन खेळाडू.

1961 मध्ये सुरु झालेला अर्जुन पुरस्कार चे पहिले मानकरी म्हुणुन नंदू नाटेकर यांना गौरविण्यात आले होते. त्यांनी 15 वर्षाच्या कारकिर्दीत 100 पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःची एक संस्था देखील सुरु केली. नंदू नाटेकर स्पोर्ट्स अँड फिटनेस (एनएसएफ) चे संचालकपदी होते. 1951 ते 1963 दरम्यान झालेल्या 16 एकेरी सामन्यांपैकी 12 आणि डबल्समध्ये 16 पैकी 8 सामने त्यांनी आपल्या नावावर करून घेतले. 1980 आणि 1981 मध्ये त्यांनी दुहेरी पदक जिंकलं. थॉमस चषक स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्त्व देखील केलं होतं.

आपल्या अनोखी खेळामुळे प्रसिद्ध असलेल्र्या नाटेकरांना ‘गोल्डन बॉय ऑफ इंडियन बॅडमिंटन’ म्हुणुन देखील संभोधले जात होते.त्यांचा मुलगा गौरव नाटेकर हा देखील टेनिस खेळतो. त्याने सात वेळा भारतीय राष्ट्रीय चॅम्पियनचा मन मिळवला आहे.

नाटेकरांच्या निधनानंतर भारतातील विविध क्षेत्रातील लोकांनी ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली वाहिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फाळणीपूर्वी पाकिस्तानला गेले, 1981 मध्ये पुन्हा गोव्यात आले; 44 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

Panajim: सहा दिवस उलटले, मांडवीत बुडालेली बोट काढण्यासाठी अजूनही हालचाली नाही

New IPO: 200 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट; गोव्यातील 'मोलबायो डायगनोस्टीक' कंपनीचा लवकरच येणार आयपीओ

Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT