P.V Sndhu Dainik Gomantak
क्रीडा

Badminton Asia Team Championships: भारतीय बॅडमिंटन महिला संघाने रचला इतिहास, आशिया चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये मारली धडक

India Beat Japan: 17 वर्षीय अनमोल खरब याने भारताला विजेतेपदाच्या लढतीत नेण्यासाठी निर्णायक एकेरी जिंकली. भारतीय महिला संघ आता रविवारी अंतिम फेरीत थायलंडशी भिडणार आहे.

Manish Jadhav

Badminton Asia Team Championships 2024: भारतीय महिला बॅडमिंटन संघाने इतिहास रचला. या संघाने शनिवारी रोमहर्षक उपांत्य फेरीत दोन वेळा माजी चॅम्पियन जपानचा 3-2 असा पराभव करुन आपली स्वप्नवत मोहीम सुरु ठेवली आणि प्रथमच बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तृषा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जागतिक क्रमवारीत 23 व्या क्रमांकाची जोडी, जागतिक क्रमवारीत 53व्या स्थानी असलेली अश्मिता चालिहा आणि 17 वर्षीय अनमोल खरब यांनी पहिल्या दुहेरी आणि दुसऱ्या आणि निर्णायक एकेरीत शानदार विजय मिळवून भारताला विजेतेपद मिळवून दिले. रविवारी अंतिम फेरीत भारताचा सामना थायलंडशी होणार आहे

दरम्यान, जपानी संघ अकाने यामागुची (जागतिक क्रमांक चार), युकी फुकुशिमा आणि सायाका हिरोटा (जागतिक क्रमांक सात) आणि मयु मात्सुमोटो आणि वाकाना नागहारा (जागतिक क्रमांक आठवा) यांच्याशिवाय खेळत होता. पण असे असूनही, एक मजबूत संघ होता आणि त्याने भारतासमोर खडतर आव्हान उभे केले होते. दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या पीव्ही सिंधूला पहिल्या एकेरीत आया ओहोरीविरुद्ध विजय नोंदवता आला नाही आणि तिला 13-21, 20-22 असा पराभव पत्करावा लागला.

दुसरीकडे, तृषा आणि गायत्री यांनी पहिल्या दुहेरीत चमकदार कामगिरी करत भारताला 21-17, 16-21, 22-20 ने नामी मात्सुयामा आणि चिहारु शिडा या जगातील सहाव्या क्रमांकाच्या जोडीवर 73 मिनिटांत विजय मिळवून 1-1 अशी आघाडी मिळवून दिली. अस्मिताने माजी विश्वविजेत्या नोजोमी ओकुहारा (20व्या क्रमांकावर) विरुद्ध पुन्हा आक्रमक खेळ दाखवला. अस्मिताने तिच्या क्रॉस शॉट्स आणि स्मॅशचा शानदार वापर करुन भारताला 21-17, 21-14 असा विजय मिळवून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

तनिषा क्रॅस्टोला दुखापत झाली, ज्यामुळे सिंधूला अश्विनी पोनप्पाच्या साथीने रेना मियाउरा आणि अयाको साकुरामोटो या जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकाच्या जोडीचा अडथळा पार करता आला नाही आणि 43 मिनिटांत 14-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला. अनमोलला जगातिक क्रमवारीत 29व्या स्थानी असलेल्या नत्सुकी एनडायरा याला पराभूत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती आणि या भारतीयानेही 52 मिनिटांत 21-14, 21-18 असा विजय मिळवून भारताला प्रथमच अंतिम फेरीत पोहोचवले. भारत आता या महाद्वीपीय चॅम्पियनशिपमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारताने 2016 आणि 2020 च्या सीझनमध्ये पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT