World Badminton Championship: एचएस प्रणॉयला कांस्य पदक! 'ही' कामगिरी करणारा 5 वा भारतीय खेळाडू

HS Prannoy: वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या एचएस प्रणॉयने कांस्य पदकाची कमाई केली आहे.
HS Prannoy
HS PrannoyDainik Gomantak
Published on
Updated on

India shuttler HS Prannoy settle for Bronze medal in World Badminton Championships 2023:

डेन्मार्कमध्ये वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत शनिवारी (26 ऑगस्ट) भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयला पुरुष एकेरी प्रकारात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीत प्रणॉयला पराभवाचा धक्का बसला.

उपांत्य फेरीत प्रणॉयला कुनलावुत वितिदसर्नकडून 21-18, 13-21, 14-21 अशा फरकाने तीन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रणॉयचे सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न भंगले. पण असे असले तरी त्याने या स्पर्धेत कांस्य पदकावर नाव कोरले. त्याच्याव्यतिरिक्त या स्पर्धेत भारतीय खेळाडू उपांत्य फेरीपर्यंत पोहचू शकले नव्हते.

HS Prannoy
Korea Open: सात्विक-चिरागने पुन्हा उंचावलं भारताचं नाव! अव्वल मानांकित जोडीला पराभूत करत जिंकले विजेतेपद

उपांत्य फेरीतील पहिला गेल चांगलाच चूरशीचा झाला. 24 मिनिटे चाललेल्या या गेममध्ये प्रणॉयने त्याच्या आक्रमक खेळासह वर्चस्व ठेवले. त्यामुळे त्याने पहिला गेम त्याने 21-18 असा जिंकला.

मात्र, वितिदसर्नने दुसऱ्या गेममध्ये दमदार पुनरागमन केले आणि 21-13 असा विजय मिळवत सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना निर्णयक तिसऱ्या गेममध्ये गेला.

तिसऱ्या गेममध्ये वितिदसर्नने त्याची लय कायम ठेवली. त्यामुळे त्याला प्रणॉयला पराभूत करणे सोपे गेले. तिसरा गेम वितिदसर्नने 14-21 असा जिंकत सामनाही जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

HS Prannoy
HS Prannoy: वर्षाच्या अखेरीसही एचएस प्रणॉयसाठी आनंदाची बातमी! रँकिंगमध्ये घेतली गरुडझेप

दरम्यान, प्रणॉयने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा खेळाडू विक्टोर ऍक्सेलसनला 13-21, 21-15, 21-16 अशा फरकाने तीन सेटमध्ये पराभूत केले होते. त्याचबरोबर पदक निश्चित करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

प्रणॉय वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेतील पुरुष एकेरीत पदक जिंकणारा पाचवा खेळाडू आहे. त्याच्याआधी प्रकाश पदुकोण, बी साई प्रणित, किदांबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांनी अशी कामगिरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com