Babar Azam Pakistan Cricket Team Captain
Babar Azam Pakistan Cricket Team Captain Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam: प्रायव्हेट व्हिडिओ लीक प्रकरणानंतर बाबरचे पहिले ट्वीट, म्हणाला...

Pranali Kodre

Babar Azam: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या मैदानाबरोबर मैदानाबाहेरील घटनांमुळेही बराच चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे क्रिकेटविश्वात बरीच खळबळ माजली आहे. त्यातच आता बाबरने एक ट्वीट केले आहे.

बाबरचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल

बाबर आझमचा जो प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात तो एका दुसऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंडबरोबर बोलत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान हा व्हिडिओ खरा आहे की खोटा, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, अनेकांनी हा व्हिडिओ खरा असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी बाबरची प्रतिमा खराब करण्यासाठी हा खोटा व्हिडिओ शेअर केल्याचे म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये प्रथमदर्शनी असे दिसत आहे की बाबर दुसऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंडला त्याच्याबरोबर संबंध ठेवण्यास सांगतो. यावेळी तिच्या प्रियकराला संघात जागा हवी असेल, तर तिला संबंध ठेवावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही म्हटले जात आहे.

बाबरचे ट्वीट

प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरलचे प्रकरण चिघळत असतानाच बाबरने ट्वीट केले आहे की 'आनंदी राहण्यासाठी तुम्हाला फार काही करावे लागत नाही.' त्याचे हे ट्वीट देखील आता चर्चेत आले असून त्यावर सोशल मीडिया युजर्सकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. हे ट्वीट करताना बाबरने त्याचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

बाबर कर्णधारपदावरूनही होऊ शकतो पायउतार

दरम्यान, बाबरची कसोटी कर्णधार म्हणून गेल्याकाही दिवसात झालेली कामगिरी पाहाता त्याच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला मायदेशात झालेल्या गेल्या तीन कसोटी मालिकेतील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या दोन मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर न्यूझीलंडविरुद्धची मालिका अनिर्णित राहिली.

दरम्यान, बाबरची वैयक्तिक कामगिरी पाहिली, तर ती चांगली राहिली आहे. नुकतेच त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दोन अर्धशतकेही केली आहेत. तसेच २०२२ वर्षासाठी बाबरला आयसीसीच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी नामांकनही मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

SCROLL FOR NEXT