Babar Azam
Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam World Record: कराची कसोटीत बाबरने मोडला 'वर्ल्ड रिकॉर्ड'

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक का मानला जातो, याचा खरा साक्षात्कार कराची कसोटीदरम्यान आला आहे. बाबरने कराची कसोटीच्या चौथ्या डावात अशी खेळी केली आहे, जी जागतिक क्रिकेटमध्ये कोणताही कर्णधार करु शकला नाही. बाबर आझम (Babar Azam) कर्णधार म्हणून चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. (Babar Azam has broken Michael Atherton world record)

दरम्यान, बाबरने मायकल अथर्टनचा (Michael Atherton) विश्वविक्रम मोडला आहे. 185 धावांचा टप्पा पार करताच बाबर कसोटीच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. मायकेल आथर्टनने 1995 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) चौथ्या डावात 185 धावा केल्या होत्या. आता बाबर आझमने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबर आझम चौथ्या डावात सर्वाधिक वेळ क्रीजवर घालवणारा पाकिस्तानी फलंदाज बनला आहे. बाबरने 491 मिनिटे फलंदाजी केल्यानंतर हा विक्रम आपल्या नावावर केला.

तसेच, बाबरने दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. मात्र, 2020 पासून त्याने सर्वाधिक 50 धावांच्या खेळी खेळल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT