IPL 2022: यजुवेंद्र चहल राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी? जोस बटलरसह सलामी!

एकेकाळी आरसीबीकडून खेळणारा चहल (Yajuvendra Chahal) आता राजस्थानला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
Yajuvendra Chahal
Yajuvendra ChahalDainik Gomantak

आयपीएल 2022 (IPL 2022) चा 15 वा सीझन 26 मार्चपासून सुरु होत आहे. सर्व संघांनी तयारीही सुरु केली आहे. बहुतेक खेळाडू त्यांच्या फ्रँचायझींमध्ये सामील झाले आहेत. श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) मालिका खेळलेल्या भारतीय खेळाडूंनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. या खेळाडूंमध्ये यजुवेंद्र चहलचाही (Yajuvendra Chahal) समावेश आहे, जो यावेळी राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. एकेकाळी आरसीबीकडून खेळणारा चहल आता राजस्थानला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. (Yajuvendra Chahal can open for Rajasthan Royals in IPL 2022)

दरम्यान, राजस्थानला सामना जिंकून देण्यात चहलची गोलंदाजी महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, यादरम्यान राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) एका ट्विटने सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. राजस्थानने संघाचा नवा कर्णधार म्हणून यजुवेंद्र चहलची नियुक्ती केली आहे. राजस्थान रॉयल्सने म्हटले की, यजुवेंद्र चहल जोस बटलरसोबत सलामी करु शकतो. मात्र, त्यासाठी फ्रेंचायझीने एक अटही घातली आहे.

Yajuvendra Chahal
IPL 2022: पुण्याचे पीच तयार करणार 'पहाडी' माणूस

तसेच, राजस्थान रॉयल्सने ट्विट करत म्हटले की, '10 हजार रिट्विट्स आणि यजुवेंद्र चहल जोश बटलरसोबत ओपनिंग करेल.' राजस्थान रॉयल्सचे हे ट्विट पाहून सगळेच थक्क झाले आहेत. यजुवेंद्र चहलनेच राजस्थान रॉयल्सच्या अकाऊंटवरुन हे ट्विट केल्याचे मानले जात आहे.

Yajuvendra Chahal
IPL 2022: CSK ठरला IPL मध्ये सर्वाधिक प्लेऑफ खेळणारा संघ, टॉप-4 मध्ये बोलबाला

चहलने राजस्थान रॉयल्सचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याबद्दल सांगितले

यजुवेंद्र चहलने बुधवारी एका ट्विटद्वारे राजस्थान रॉयल्सचे खाते हॅक झाल्याचे सांगितले. त्यानंतर राजस्थानने नायक चित्रपटातील अनिल कपूरचा डायलॉग पोस्ट करुन प्रत्युत्तर दिले.

राजस्थान रॉयल्स संघ: संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, करुण नायर, रसी व्हॅन डर दुसान, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, डॅरेल मिशेल, अरुणय सिंग, रियान पराग, शुभम गढवाल, रविचंद्रन नेहेम सेन, जेम्स अश्विन, के. नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर-नाईल, ओबेद मॅककॉय, प्रणम कृष्णा, केसी करिअप्पा, तेजस बारोका, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com