Afghanistan vs Pakistan 2nd ODI: हंबनटोटा येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा एक विकेटने पराभव केला.
301 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ एका टप्प्यावर पराभवाच्या उंबरठ्यावर होता पण शेवटच्या षटकात नसीम शाहच्या फलंदाजीने त्यांना विजय मिळवून दिला.
या विजयासह पाकिस्तानने केवळ एकदिवसीय मालिका जिंकली नाही तर या फॉरमॅटमधील नंबर 1 संघ बनला आहे. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम एका चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला आहे.
सामन्यानंतर बाबरने असे काही केले जे त्याच्याकडून अपेक्षित नव्हते आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, बाबर आझमने काय केले? सामना संपल्यानंतर बाबर आझम चांगलाच संतापलेला दिसत होता. तो अम्पायर्संना काहीतरी बोलताना दिसत होता आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंनाही काही बोलत होता. यावेळी बाबर आझम खूपचं संतापला होता. मात्र, बाबरचे असे वागणे याआधी कधीच पाहायला मिळाले नसल्याने चर्चा रंगली आहे.
बाबर आझमच्या (Babar Azam) नाराजीचे खरे कारण समोर आलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानी कर्णधाराची नाराजी शादाब खानच्या नॉन स्ट्राईक रन आऊटमुळे होती. यासोबतच नो बॉल न दिल्याच्या मुद्द्यावरही तो संतापला होता.
शेवटच्या षटकात अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी याने शादाब खानला नॉन स्ट्राइकवर धावबाद केले होते. अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच शादाब खानने क्रीज सोडली होती.
दुसरीकडे, गुरुवारी अफगाणिस्तानने 50 षटकात 301 धावा केल्यामुळे पाकिस्तानी संघाला पराभव डोळ्यासमोर दिसत होता आणि त्यानंतर बाबर अँड कंपनीने 226 धावांवर 6 विकेट गमावल्या.
मात्र, यानंतर शादाब खानने 48 आणि नसीम शाहने 5 चेंडूत नाबाद 10 धावा करत पाकिस्तानला (Pakistan) विजय मिळवून दिला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.