Axar Patel & Jasprit Bumrah  Dainik Gomantak
क्रीडा

Axar Patel Record: अक्षर पटेलने रचला इतिहास, बुमराह-अश्विनला टाकले मागे

Axar Patel Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळला गेला.

Manish Jadhav

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावाच्या जोरावर 91 धावांची आघाडी घेतली होती.

भारताकडून शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज शतके झळकावली. त्याचवेळी, अक्षर पटेलने सामन्याच्या दुसऱ्या डावात विकेट घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आणि त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकले.

अक्षर पटेलने अप्रतिम कामगिरी केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) दुसऱ्या डावात अक्षर पटेलने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. या विकेटससह अक्षर भारतासाठी सर्वात कमी चेंडू टाकून 50 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

त्याच्या आधी भारताकडून (India) सर्वात जलद 50 विकेट्स घेण्याचा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर होता. अक्षर आपला फक्त 12 वा सामना खेळत असून त्याने हा मोठा विक्रम केला आहे.

सर्वात कमी चेंडू टाकत 50 बळी घेणारा भारतीय गोलंदाज

1. अक्षर पटेलने 2205 चेंडूत 50 कसोटी बळी घेतले

2. जसप्रीत बुमराहने 2465 चेंडूत 50 कसोटी बळी घेतले

3. कर्सन गावरीने 2534 चेंडूत 50 कसोटी बळी घेतले.

4. आर अश्विनने 2597 चेंडूत 50 कसोटी बळी घेतले.

तसेच, अक्षर पटेलने फेब्रुवारी 2021 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले. त्या मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली आणि एकट्याने भारतीय संघाला विजयापर्यंत नेले. त्या मालिकेत त्याने 27 विकेटस् घेतल्या.

त्याचवेळी, त्याने भारतासाठी एकूण 12 कसोटी सामन्यांमध्ये 50 विकेट घेतल्या. याशिवाय, त्याने कसोटी सामन्यात तीन अर्धशतकेही केली आहेत. त्याने भारतासाठी 49 एकदिवसीय आणि 40 टी-20 सामनेही खेळले आहेत.

विराट-शुबमनने शतके झळकावली

चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि कॅमेरुन ग्रीनच्या शतकांच्या जोरावर 480 धावा झाल्या. यानंतर टीम इंडियाने विराट कोहली आणि शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर 571 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या आधारे 91 धावांची आघाडी घेतली. आता सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 2 गडी गमावून 174 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT