India vs Australia: टीम इंडियाने जिंकली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी! फलंदाजांच्या वर्चस्वानंतर अहमदाबाद कसोटी 'ड्रॉ'

Ahmedabad Test: भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिल्याने रोहितसेनेने मालिका खिशात घातली.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs Australia, 4th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला चौथा कसोटी सामना सोमवारी (13 मार्च) अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवला.

या सामन्यात पाचव्या दिवशी काही षटके बाकी होती. पण दोन्ही संघातील कर्णधारांनी हात मिळवत पंचांना सांगून सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा सामना थांबवण्यात आला आणि अनिर्णित घोषित करण्यात आला.

सामना थांबला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 78.1 षटकात 2 बाद 175 धावा केल्या होत्या, तसेच 84 धावांची आघाडी घेतली होती. तसेच मार्नस लॅब्युशेन 63 आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ 10 धावांवर खेळत होते.

Team India
IND vs AUS: अहमदाबाद कसोटीत घडला इतिहास! भारतीय फलंदाजांनी केला आजपर्यंत कधीही न घडलेला पराक्रम

या सामन्यात पाचव्या दिवसाच्या खेळाची सुरुवात झाली, तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 7 व्या षटकापासून आणि बिनबाद 3 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. पण दिवसाच्या सुरुवातीलाच 11 व्या षटकात अश्विनने मॅथ्यू कुहनेमनला 6 धावांवर बाद केले.

पण, त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांची जोडी जमली. या दोघांनीही काही चांगले फटके खेळत 139 धावांची भागीदारी रचली. त्यांनी पहिले दोन्ही सत्र जवळपास खेळून काढले. मात्र दुसरे सत्र संपण्यास काहीच अवधी राहिलेला असताना ट्रेविस हेडला 60 व्या षटकात अक्षर पटेलने त्रिफळाची केले. त्यामुळे हेडचे शतक केवळ 10 धावांनी हुकले. त्याने 163 चेंडूत 90 धावांची खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर मार्नस लॅब्युशेनला साथ देण्यासाठी स्टीव्ह स्मिथ मैदानात आला. या दोघांनीही संयमी खेळ केला. दरम्यान लॅब्युशेनने अर्धशतकही पूर्ण केले. पण हे दोघेही फलंदादी करत असताना सामना अनिर्णित राहण्याकडे झुकत चालला होता. अखेर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.

Team India
NZ vs SL: न्यूझीलंडच्या विजयाने टीम इंडियाचं WTC Final तिकीट पक्कं! रोमांचक सामन्यात श्रीलंका पराभूत

तत्पूर्वी या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजा (180) आणि कॅमेरॉन ग्रीन (114) यांच्या शतकांच्या जोरावर सर्वबाद 480 धावा केल्या होत्या. भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात 9 बाद 571 धावा केल्या. भारताकडून या डावात विराट कोहली (186) आणि शुभमन गिल (128) यांनी शतके केली, तर अक्षर पटेलने (79) अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com