

Central Government Employees DA Hike 2026: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीमधील (DR) वाढीसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. बुधवारी, 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
नवरात्री आणि दुर्गापूजा सणादरम्यान महागाई भत्ता वाढेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती, मात्र या बैठकीत निर्णय न झाल्याने त्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला. तरीही, चालू सणासुदीचा काळ लक्षात घेता, सरकार दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवून मोठा दिलासा देईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 3% ते 4% वाढीची अपेक्षा आहे. जर सरकारने 3 टक्के वाढ मंजूर केली, तर DA चा दर 60 टक्क्यांवरुन वाढून 63 टक्क्यांवर पोहोचेल. तर 4 टक्के वाढ झाल्यास हा दर 64 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. यापूर्वी केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ मंजूर केली होती, जी 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्यांच्या मूळ वेतनाचा 60 टक्के झाला होता. आता सर्व कर्मचाऱ्यांना 2026 मधील दुसऱ्या वाढीची प्रतीक्षा आहे, जी 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे.
केंद्र सरकार (Central Government) सामान्यतः वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात सुधारणा करते. पहिली वाढ जानेवारीपासून आणि दुसरी जुलैपासून प्रभावी ठरते. या वाढीच्या अधिकृत घोषणा साधारणपणे मार्च-एप्रिल आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत केल्या जातात. सातव्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार आणि महागाईच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे यावेळी DA मध्ये किमान 3 टक्के वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, तरीही अंतिम निर्णय हा सरकारचाच असणार आहे. सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2026 पासूनचा थकबाकीचा लाभदेखील मिळणार आहे, ज्यामुळे दिवाळीच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.