VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

Strait Of Hormuz Cargo Ship Accident: मध्य पूर्वेतील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीत एक भीषण अपघात घडला.
Strait Of Hormuz Cargo Ship Accident
Strait Of Hormuz Cargo Ship AccidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Strait Of Hormuz Cargo Ship Accident: मध्य पूर्वेतील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीत एक भीषण अपघात घडला. या दुर्घटनेशी संबंधित एक थक्क करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामध्ये समुद्राच्या पाण्यावर हजारो आयफोनचे बॉक्सेस आणि महागड्या लक्झरी परफ्यूमच्या बाटल्या तरंगताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरातीची मालकी असलेले आणि सिंगापूरचा ध्वज असलेले 'जीएफएस फ्राईड' हे मालवाहू जहाज सागरी सुरुंगाला धडकल्याने त्याला आग लागली. सुरुंगाच्या स्फोटामुळे जहाजाचा तोल गेला आणि ते समुद्रात उलटले. या अपघातामुळे जहाजावरील सुमारे 2500 कंटेनर समुद्रात कोसळले, ज्यातील आयफोन आणि परफ्यूमच्या (Perfume) बाटल्या पाण्यात पसरल्या. व्हायरल व्हिडिओमध्ये स्थानिक लोक छोट्या बोटींमधून जाऊन समुद्रात तरंगणारे आयफोन आणि परफ्यूम गोळा करताना दिसत आहेत. सुदैवाने, या जहाजावरील 21 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून कोणीही जखमी झालेले नाही.

Strait Of Hormuz Cargo Ship Accident
Iran Torlls UN: शोलेच्या ‘ठाकूर’सारखी युएनची अवस्था! इराणच्या नव्या मीम डिप्लोमेसीनं उडवली खळबळ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

इणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने दिलेल्या माहितीनुसार, हे मालवाहू जहाज अनधिकृत मार्गाने जात असताना सागरी सुरुंगाला धडकून बुडाले. तर दुसरीकडे, सिंगापूर कोस्ट गार्डच्या मते या जहाजावर अज्ञात शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीच्या भागात गेल्या काही दिवसांपासून लष्करी तणाव आणि हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. यापूर्वी 6 ऑक्टोबर रोजी अमेरिकन सैन्याने ओमानच्या आखातात इराणी गस्ती नौकेवर हल्ला करुन ती नष्ट केली होती, तर 23 सप्टेंबर रोजी 'केप डाओ' हे मालवाहू जहाजही अशाच हल्ल्यात बुडाले होते, ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.

Strait Of Hormuz Cargo Ship Accident
US Iran Secret Talks: अमेरिका आणि इराण यांच्यात 3 तास सिक्रेट मीटिंग, डोनाल्ड ट्रम्प यांचा तेहरानला थेट आणि खणखणीत इशारा; म्हणाले, 'एक मार्ग विनाशाचा तर...'

अमेरिकेने घातलेले कडक निर्बंध आणि सागरी नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून इराण या भागात सागरी वाहतुकीला लक्ष्य करत असल्याचे बोलले जात आहे. जगभरातील एकूण खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यापैकी तब्बल पाचवा भाग याच होर्मुझ सामुद्रधुजीतून पार होतो. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षांमुळे या महत्त्वपूर्ण व्यापारी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, इराण या मार्गावर आपले वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, तर अमेरिका हा मार्ग स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या जागतिक संघर्षाचा फटका आता आंतरराष्ट्रीय व्यापाराला बसताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com