Avinash Sable Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023: महाराष्ट्राच्या पोराचा चीनमध्ये डंका, अविनाश साबळेने जिंकलं 'गोल्ड'

Avinash Sable: 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताचा स्टार अॅथलीट अविनाश साबळे याने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.

Manish Jadhav

Asian Games 2023: हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताचा स्टार अॅथलीट अविनाश साबळे याने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण जिंकणारा अविनाश हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यासह अविनाशने 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऍथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

त्याने 8:19:50 सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले आणि यादरम्यान त्याने मोठा रेकॉर्ड देखील मोडला.

दरम्यान, अविनाशचे पदक हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे (India) 12 वे सुवर्ण आणि हांगझोऊमधील पहिले ट्रॅक आणि फील्ड सुवर्ण आहे. अविनाश साबळेने इतर खेळाडूंपेक्षा जास्त अंतर कापले होते.

विशेष म्हणजे, शेवटच्या 50 मीटर दरम्यान त्याच्या मागे कोणीही नव्हते. पाठीमागे कोणी नसल्याचे पाहून अविनाश आनंद साजरा करतानाही दिसला.

दुसरीकडे, भारताने अॅथलेटिक्समध्ये म्हणजे ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याची अपेक्षा आहे. अविनाश साबळेने सुवर्णपदक जिंकून त्या अपेक्षा कायम ठेवल्या आहेत.

अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. स्पर्धेत भारताने पहिल्या सात दिवसांत चांगली कामगिरी केली होती.

पदकांची संख्या 38 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये 10 सुवर्ण आणि 14 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. 8 व्या दिवशी आतापर्यंत भारताच्या खात्यात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदक आले असून एकूण पदकांची संख्या 44 वर पोहोचली आहे.

निखत जरीनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत स्टार महिला बॉक्सर निखत जरीनला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात निखतला थायलंडच्या खेळाडूकडून 2-3 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिला आता कांस्यपदकावर समाधान मानावे लागणार आहे.

मात्र, उपांत्य फेरीत धडक मारुन तिने 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. महिला हॉकी स्पर्धेत भारताने दक्षिण कोरियाच्या (South Korea) संघाविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT