Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: टीम इंडियात 'या' खेळाडूला संधी मिळणे झाले बंद, आशिया कप 2022 मध्ये...!

Indian Cricket Team: श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय सिलेक्टर्स लवकरच संघाची घोषणा करु शकतात.

दैनिक गोमन्तक

Indian Cricket Team: श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय सिलेक्टर्स लवकरच संघाची घोषणा करु शकतात. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळू शकते, परंतु एक खेळाडू असा आहे, जो या मालिकेतही संघाचा भाग असेल असे वाटत नाही. आशिया कप 2022 पर्यंत हा खेळाडू सिलेक्टर्सची पहिली पसंती राहिला होता, परंतु या स्पर्धेपासून या खेळाडूला एकही टी-20 सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

या खेळाडूला टीम इंडियात संधी मिळणे बंद झाले

आशिया कप 2022 मधील खराब कामगिरीनंतर 26 वर्षीय वेगवान गोलंदाज आवेश खानला (Avesh Khan) संघातून वगळण्यात आले. या स्पर्धेपासून तो भारतीय टी-20 संघात पुनरागमन करु शकलेला नाही. श्रीलंकेविरुद्धही (Sri Lanka) त्याला संधी मिळणे अशक्य होते. आवेश खान 2022 च्या आशिया चषकापूर्वी सातत्याने संघाचा भाग बनत होता, परंतु त्याला संधीचा फायदा घेता आला नाही.

आशिया कपमध्ये अत्यंत महागडी गोलंदाजी

आशिया कप 2022 मध्ये, वेगवान गोलंदाज आवेश खान टीम इंडियाच्या पराभवाचा सर्वात मोठा खलनायक ठरला. त्याने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध 2 षटकांत 19 गोलंदाजी केली आणि फक्त 1 बळी घेतला. त्याचवेळी, हाँगकाँगविरुद्ध, त्याने 13.25 च्या इकॉनॉमीसह 4 षटकात 53 धावा दिल्या आणि फक्त 1 बळी घेतला. आवेश खानची ही खराब कामगिरी त्याच्यासाठी टेन्शन बनली आहे. सध्या तो रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशकडून खेळत आहे. यादरम्यान त्याने रेल्वेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात 69 धावांत चार विकेट्सही घेतल्या आहेत.

टीम इंडियामध्ये संधी मिळत होत्या

आवेश खानने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करुन टीम इंडियामध्ये स्थान निर्माण केले होते, मात्र तो सातत्याने फ्लॉप ठरला. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 15 टी-20 आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या T20 सामन्यांमध्ये आवेश खानने 9.11 च्या इकॉनॉमीसह धावा देत 13 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यात त्याच्याकडे 3 विकेट्स आहेत. त्याने या वर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT