Team India: भारताचा विजय अन् पाकिस्तानला झटका, 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या...'

Pakistan Cricket Team: बांगलादेशविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाने 3 विकेट्स राखून विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिकेतही क्लीन स्वीप केला.
India Test Team
India Test Team Dainik Gomantak
Published on
Updated on

World Test Championship Final Race: बांगलादेशविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाने 3 विकेट्स राखून विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिकेतही क्लीन स्वीप केला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा फायदा भारतीय संघाला मिळाला आहे. बांगलादेशच्या संघाने कसोटी सामन्यात कडवी झुंज दिली, परंतु रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यरच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला.

अशी स्थिती पॉइंट टेबलची आहे

बांगलादेशवर (Bangladesh) सनसनाटी विजय मिळवत भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत केले आहे. गतवेळचा उपविजेता भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताच्या विजयाची टक्केवारी 55.77 वरुन 58.93 वर पोहोचली आहे. पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) अव्वल आहे, तर दक्षिण आफ्रिका (54.55%) तिसऱ्या आणि श्रीलंका संघ चौथ्या क्रमांकावर आहे. अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.

India Test Team
Team India: निवृत्तीनंतरही मैदानात परतणार टीम इंडियाचे 'हे' दोन धाकड खेळाडू

हे काम भारतीय संघाला करावे लागणार आहे

ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणार हे निश्चित दिसत आहे. त्याचवेळी, दुसऱ्या स्थानावर राहण्यासाठी टीम इंडियाला पुढील वर्षी मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका जिंकावी लागेल, जेणेकरुन ते सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करु शकेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पराभवाचा सामना करावा लागला होता.

पाकिस्तान अंतिम शर्यतीतून बाहेर

या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये पाकिस्तानी संघ सातव्या क्रमांकावर असून त्याचे 38.89% गुण आहेत. इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला, त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्याच्या आशा धुळीस मिळाल्या. आता पाकिस्तानी संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये संघाने चांगली कामगिरी केल्यास ते 38.89% ते 47.62% पर्यंत पोहोचू शकतात, जे अंतिम फेरीत जाण्यासाठी पुरेसे नाही.

India Test Team
Team India: भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी, अचानक फॉर्ममध्ये परतला 'हा' मॅच विनर!

तसेच, मीरपूर कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने भारताचा पराभव करावा, अशी प्रार्थना पाकिस्तानी संघ करत होता, पण तसे झाले नाही आणि भारताने 3 गडी राखून विजय मिळवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com