Rohan Bopanna Dainik Gomantak
क्रीडा

Australian Open 2024: रोहन बोपन्नाने रचला इतिहास; 43 व्या वर्षी बनला 'ग्रँड स्लॅम चॅम्पियन'

भारताच्या 43 वर्षीय रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली.

Manish Jadhav

AustralianOpen 2024: भारताचा दिग्गज टेनिस स्टार रोहन बोपण्णा याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. बोपण्णाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आणि त्याची प्रतीक्षाही संपवली. शनिवारी, 27 जानेवारी रोजी मेलबर्न पार्क येथे झालेल्या अंतिम फेरीत बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी सिमोन बोलेली आणि आंद्रे वावसोरी या इटालियन जोडीचा 7-5, 7-5 असा पराभव करुन विजेतेपद पटकावले.

यासह बोपण्णाने कारकिर्दीत प्रथमच पुरुष दुहेरीचे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. एवढेच नाही तर वयाच्या 43 व्या वर्षी हे विजेतेपद पटकावत त्याने इतिहास रचला आहे. ग्रँडस्लॅममध्ये पुरुषांच्या कोणत्याही स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. मागील विक्रम नेदरलँड्सच्या जीन-ज्युलियन रॉजरच्या नावावर होता, ज्याने (40 वर्षे आणि नऊ महिने) मार्सेलो अरेव्होलाच्या साथीने 2022 च्या फ्रेंच ओपनमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते.

दरम्यान, गेल्या वर्षी बोपण्णा-एब्डेन जोडीला यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र नवीन वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅममध्ये या जोडीने विजेतेपद पटकावत शानदार सुरुवात केली. 2003 मध्ये आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात करणारा बोपण्णा पुरुष दुहेरीत ग्रँड स्लॅम जेतेपदाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होता पण त्यात त्याला कधीच यश आले नाही. त्याच्या कारकिर्दीतील एकमेव ग्रँडस्लॅम 2017 मध्ये आले होते, जेव्हा त्याने फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.

मेलबर्न पार्कवर झालेल्या या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या जोडीला विजयासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. स्पर्धेतील द्वितीय मानांकित या जोडीने पहिल्या सेटमध्ये बोपण्णा-एब्डेन कडवी झुंज दिली. पण त्यांनी टायब्रेकरमध्ये इटालियन जोडीला रोखले. दुसरा सेटही टायब्रेकरच्या दिशेने जाईल असे वाटत होते पण 5-5 असा टाय झाल्यानंतर बोपण्णा आणि एब्डेनने बोलाई-वावसोरीची सर्व्हिस ब्रेक करत विजयाच्या दिशेने एक पाऊल टाकले. त्यानंतर पुढच्याच गेममध्ये बोपण्णा-एब्डेन जोडीने त्यांच्या सर्व्हिसवर विजेतेपद पटकावले.

दुसरीकडे, या विजयासह बोपण्णाने या आठवड्याचा शेवट स्वत:साठी गोड केला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचताच त्याने एटीपी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले. यासह, तो नंबर-1 रँक गाठणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. याच्या एका दिवसानंतर भारत सरकारने त्याला पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. आता त्याने प्रथमच पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकून आपली प्रतीक्षा संपवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT