Australian Open 2024: जोकोविचचा धडाका कायम! उपांत्यपूर्व फेरीत धडक मारत फेडररच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

Novak Djokovic: नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत रॉजर फेडररच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
Novak Djokovic
Novak DjokovicX/AustralianOpen
Published on
Updated on

Novak Djokovic reached Australian Open 2024 quarterfinals:

ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धा सध्या मेलबर्नला चालू असून या स्पर्धेत सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच देखील खेळत आहे. जोकोविचने रविवारी (21 जानेवारी) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यासह त्याने रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

रविवारी जोकोविचने 20 व्या मानांकित ऍड्रियन मनारियोविरुद्ध 6-0, 6-0, 6-3 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह तो उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला.

दरम्याने 24 ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचने ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीमध्ये विक्रमी 58 व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्याने रॉजर फेडररची बरोबरी केली आहे. फेडररनेही ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीत 58 वेळा उपांत्य फेरी खेळली आहे.

Novak Djokovic
Roger Federer: 'विम्बल्डनच्या किंग'ला खेळत नसतानाही स्टँडिंग ओव्हेशन! पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

त्यामुळे आता सर्वाधिकवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरी उपांत्य फेरीत पोहण्याचा विश्वविक्रम रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांच्या नावावर संयुक्तरित्या आहे.

इतकेच नाही तर जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सलग 32 वा विजय मिळवला आहे. तो 2018 मध्ये या स्पर्धेत अखेरचा पराभूत झाला होता. तसेच 2022 मध्ये तो या स्पर्धेत खेळला नव्हता.

जोकोविच यंदा 11 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन आणि 25 व्यांदा ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याच्या हेतूने खेळत आहे.

Novak Djokovic
Novak Djokovic: 'आता एकत्र खेळू...', विराटने पहिल्या मेसेजबद्दल खुलासा केल्यानंतर जोकोविचं ट्वीट चर्चेत

मनारियोविरुद्ध जोकोविचचे पूर्ण वर्चस्व

रविवारी झालेल्या सामन्यात जोकोविचने मनोरियाला पहिल्या दोन्ही सेटमध्ये पूर्णपणे नेस्तनाभूत केले होते. त्याने त्याची सर्विस राखण्याबरोबरच मनारियोच्या सर्विसही ब्रेक केल्या.

मात्र, नंतर तिसऱ्या सेटमध्ये मनारियोने झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, या सेटमध्येही जोकोविचने सहज विजय मिळवला आणि हा सामनाही जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचचा सामना 12 व्या मानांकित टेलर फ्रिट्झविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com