Australian Open 2024: 43 व्या वर्षी बोपन्नाचा विक्रमी 501 वा विजय; पण बालाजीचं आव्हान संपुष्टात

Rohan Bopanna: रोहिन बोपन्नाने 501 वा विजय मिळवत ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
Rohan Bopanna
Rohan BopannaX
Published on
Updated on

Rohan Bopanna 501 career win:

भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना सध्या ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत तो पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी गटात सामील झाला आहे. दरम्यान, त्याने पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एडेनबरोबर खेळताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

रोहन आणि मॅथ्यू यांच्या जोडीने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन आणि एडवर्ड विंटर यांना दुसऱ्या फेरीत 6-2, 6-4 अशा फरकाने पराभूत केले होते. दरम्यान, हा विजय 43 वर्षीय रोहन बोपन्नासाठी खास ठरला. हा त्याच्या कारकिर्दीतील 501 वा विजय ठरला.

Rohan Bopanna
Sumit Nagal: भारताच्या सुमीतचा ऐतिहासिक विजय! मानांकित बब्लिकला हारवत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत

दुसरी मानंकित जोडी असलेल्या रोहन आणि मॅथ्यू यांनी पहिल्या फेरीत जेम्स डकवर्थ आणि मार्क पोलमन्स यांना 7-6 (7), 4-6, 7-6 (10) अशा फरकाने पराभूत केले होते. हा रोहनचा ५०० वा विजय होता.

रोहन आणि मॅथ्यू गेले अनेक स्पर्धा एकत्र खेळत आहेत. त्यांनी गेल्याचवर्षी अमेरिकन ओपन 2023 स्पर्धेत तसेच नुकत्याच झालेल्या ऍडलेड इंटरनॅशनल 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र, त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही.

Rohan Bopanna
AUS vs WI: करत होता सिक्युरिटी गार्डची नोकरी, आता पदार्पणातच शमर जोसेफने रचला इतिहास

बालाजी आणि नागलचं संपलं आव्हान

दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत भाकताला एन श्रीराम बालाजी व्हिक्टर व्लाड कॉर्नियाबरोबर पुरुष दुबेरीत सहभागी झाला होता. मात्र त्यांच्या जोडीला दुसऱ्या फेरीत मार्सेलो अरेवालो आणि मेट पेविकविरुद्ध 6-3, 6-3 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

तसेच पुरुष एकेरीत भारताच्या सुमीत नागलने दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र दुसऱ्या फेरीत त्याला चीनच्या जूनचेंग शँगकडून पराभवाचा धक्का बसला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com