Lisa Sthalekar FB/Lisa Sthalekar
क्रीडा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्टालेकर FICA च्या पहिल्या महिला अध्यक्षा

पुण्यात जन्मलेल्या लिसाने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 187 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले.

दैनिक गोमन्तक

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाची दिग्गज क्रिकेटपटू लिसा स्टालेकर फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स (FICA) ची पहिली महिला अध्यक्ष बनली आहे. नियॉन, स्वित्झर्लंड येथे झालेल्या FICA कार्यकारी समितीच्या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार, 42 वर्षीय लिसा स्टालेकरची या पदावर नियुक्ती केली. त्यांच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज बॅरी रिचर्ड्स, वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू जिमी अॅडम्स आणि अलीकडेच इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोळंकी यांनी हे पद भूषवले आहे. ()

"निऑन, स्वित्झर्लंड येथे या आठवड्यात झालेल्या FICA कार्यकारी समितीच्या बैठकीत लिसाची FICA च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड-19 महामारीनंतर FICA ची ही पहिलीच बैठक होती. " आमच्या सदस्यांशी सल्लामसलत केल्यानंतर, आमच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून लिसा यांची नियुक्ती झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे," असे FICA चे कार्यकारी अध्यक्ष हीथर मिल्स यांनी सांगितले.

दरम्यान, लिसा यांनी आपले मत व्यक्त केले, "आम्ही खेळाच्या एका नवीन युगात प्रवेश करत आहोत ज्यामध्ये आमच्या पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी पूर्वीपेक्षा अधिक क्रिकेटचा समावेश आहे. आता अनेक देश हा खेळ खेळत आहेत जे क्रिकेट हा जागतिक खेळ बनत असल्याचा पुरावा आहे." पुण्यात जन्मलेल्या लिसा यांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 187 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने सर्वोत्तम कामगिरी केली.

लिसाने 125 एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके आणि 16 अर्धशतकांच्या मदतीने 2728 धावा केल्या. याशिवाय तिने ऑफ स्पिनर म्हणून 146 विकेट्स घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 बळी घेणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरली. तिने आठ कसोटी आणि 54 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले. 2021मध्ये त्याचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

Goa Live News: विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

SCROLL FOR NEXT