इंग्लंडला हरवणे कठीण, मॅक्युलम प्रशिक्षकपदी; जाणून घ्या बेन स्टोक्सच्या संघाची ताकद

ही कसोटी मालिका जिंकणे भारतीय संघासाठी सोपे नसेल, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला .
team England
team England Dainik Gomantak
Published on
Updated on

India vs England: भारतीय संघ एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन T20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला पोहोचला आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात 1 जुलैपासून एजबॅस्टन येथे 5वी कसोटी खेळली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना असेल, या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. ओल्ड ट्रॅफर्ड येथील पाचवी आणि शेवटची कसोटी कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.(IND vs ENG Rahul Dravid)

राहुल द्रविडचा भारतीय संघावर विश्वास

ही कसोटी मालिका जिंकणे भारतीय संघासाठी सोपे नसेल, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला . रोहित शर्मा आणि त्याच्या संगाला खूप मेहनत करावी लागेल. दुसरीकडे, इंग्लंडच्या संघात जो रूट (Joe Root), बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow ) या दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय मॅक्क्युलम सध्या इंग्लंड संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. मात्र, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आपल्या संघावर विश्वास व्यक्त केला आहे.

team England
भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा महिला संघ जाहीर

इंग्लंड संघाच्या मजबूत बाजू

अलीकडेच इंग्लंडने पहिल्या दोन कसोटीत न्यूझीलंडचा पराभव केला.

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत 299 धावांचे आव्हान सहज पार केले.

रूट, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो सारखे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

भारतीय संघाने मार्चपासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

चेतेश्वर पुजारा वगळता सर्व खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त होते.

प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडसाठी उपयुक्त ठरतील.

आयपीएलमध्ये केकेआरचे प्रशिक्षक राहिलेल्या मॅक्युलमला भारतीय खेळाडूंची कमजोरी माहीत आहे.

2021 नंतर किती बदल झाले

2021 मध्ये, जो रूट आणि प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांच्या नेतृत्वाखाली संघाला कठोर परिश्रम करावे लागले. या संघाने दोन वर्षांत 17 पैकी केवळ एकच कसोटी जिंकली होती. 2021 मध्ये, रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद टॉप ऑर्डरमध्ये अपयशी ठरले. यावेळी मॅटी पॉट्सच्या आगमनाने इंग्लंडची गोलंदाजी मजबूत झाली. अष्टपैलू बेन स्टोक्सशिवाय ऑली रॉबिन्सन आणि सॅम कुरनचे पुनरागमन भारतासाठी धोक्याचे ठरू शकते.

team England
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या कारचा अपघात, 16 मिलियन बुगाटीचा चक्काचूर

सर्व खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये

जो रूट, स्टुअर्ट ब्रॉड, बेअरस्टो आणि स्टोक्स हे सर्व खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. माजी कर्णधार जो रूटने गेल्या काही सामन्यांमध्ये भरपूर धावा केल्या आहेत. 2020 पासून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 10 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर नवा कर्णधार स्टोक्सही शानदार गोलंदाजी करत आहे. इंग्लंड संघासाठी प्रशिक्षक मॅक्क्युलम हा मास्टर स्ट्रोक ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com